3 May 2024 10:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांनो! पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात 50,000 रुपये मिळतील, जबरदस्त फायदा Gratuity on Salary | पगारदारांनो! 35,000 रुपये पगार असणाऱ्यांना 1,41,346 रुपये ग्रॅच्युइटी मिळेल, अपडेट जाणून घ्या Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा
x

Multibagger Stocks | हा शेअर 1 वर्षात 67 टक्के वधारला, आता हा स्टॉक दिग्गज गुंतवणूकदाराने खरेदी केला, खरेदीचा विचार करा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | दिवाळीमध्ये शेअर मार्केट मध्ये अल्प काळ का असेना, पण थोडी भरभराट दिसून येते, आता दिवाळी काही दिवसांवर राहिली आहे. अशा परिस्थितीत, मोठ्या संख्येने शेअर मार्केटमध्ये पैसे लावणारे लोक या शुभ मुहूर्तावर मजबूत ट्रेडिंग करतात. मात्र यंदाच्या बाजारातील परिस्तिथीनुसार स्टॉकमध्ये पैसे लावण्याचा धोका कायम आहे. यावेळी किरकोळ गुंतवणूकदार आणि t ट्रेडर्स मोठ्या गुंतवणूकदारांच्या पावलावर पाऊल टाकून गुंतवणुकीचा निर्णय घेताना दिसत आहेत. तुम्ही देखील मोठ्या गुंतवणूकदारांच्या ट्रेडिंग प्लॅन ला फॉलो करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आली आहे. ज्येष्ठ गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी “एक्सप्रो इंडिया लिमिटेड” ? मध्ये गुंतवणूक केली आहे. चला तर मग जाणून घेऊ या गुंतवणुकीची सविस्तर माहिती…

जुलै ते सप्टेंबर 2022 पर्यंतच्या शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार आशिष कचोलिया यांनी Xpro India limited कंपनीचे 7,79,350 शेअर्स खरेदी केले आहे. म्हणजेच कंपनीतील त्यांची एकूण हिस्सेदारी आता 4.4 टक्के झाली आहे. 2022-2023 चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आशिष कचोलिया यांनी एक्सप्रो इंडिया कंपनीमध्ये 0.5 टक्के स्टॉक खरेदी केले होते. म्हणजेच दुसऱ्या तिमाहीत त्यांनी आपली गुंतवणूक वाढवली आहे.

Xpro India कंपनी बिर्ला समूहाचा एक भाग आहे. या कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 67 टक्क्यांचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअरच्या किमतीत यावर्षी 19 टक्क्यांची बंपर वाढ पाहायला मिळाली होती. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किमती 18 टक्क्यांनी घसरली असून गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या महिन्यापासून या स्टॉक चे प्रदर्शन निरशादायक राहिले आहे. गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किमती 1 टक्क्यांनी पडली आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1113.33 रुपये आहे.त र 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 323.47 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Xpro India limited share price return on investment 20 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x