5 May 2024 2:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

RVNL Share Price | सरकारी RVNL शेअरने एका दिवसात 9 टक्के परतावा दिला, 1 वर्षात दिला 295% परतावा, फायदा घेणार?

Highlights:

  • RVNL Share Price
  • 3 वर्षात दिला 903 टक्के परतावा
  • एका वर्षात दिला 295 टक्के परतावा
RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास निगम म्हणजेच RVNL या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये भरघोस वाढ पाहायला मिळाली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल्वे विकास निगम कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह 132.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 119.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका वर्षात RVNL कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 85 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. RVNL कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 144.50 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 29 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के घसरणीसह 124.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

3 वर्षात दिला 903 टक्के परतावा

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी 12.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 132.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 903 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही मार्च 2020 मध्ये रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10.32 लाख रुपये झाले असते.

एका वर्षात दिला 295 टक्के परतावा

RVNL कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 290.60 टक्के परतावा कमावून दिला आहे. रेल विकास निगम लिमिटेड या सरकारी रेल्वे कंपनीचे शेअर्स 7 जून 2023 रोजी 132.10 रुपयेवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने लोकांना 76.36 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 26,481 कोटी रुपये आहे.

रेल विकास निगम लिमिटेड आणि रशियन कंपनी ट्रान्समेशहोल्डिंग यांच्यात 200 वंदे भारत ट्रेन्सची निर्मती करण्याची भागीदारी झाली आहे. या दोन्ही कंपन्यांनी संयुक्त उपक्रमासाठी सर्वात कमी बोली लावली होती. 200 वंदे भारत ट्रेन्सच्या बांधकाम आणि देखभालीसाठी या कंपन्यांनी बोली जिंकली आहे. वृत्तानुसार, कंसोर्टियमला 58,000 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट मिळाले आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price today on 08 June 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x