16 June 2024 1:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Card Limit | क्रेडिट कार्ड वापरताना करू नका या 5 चुका, अचानक क्रेडिट कार्ड लिमिट कमी होईल Property Knowledge | भावांनो! तुमची बहीण विवाहित असो वा अविवाहित, वडिलोपार्जित मालमत्तेत असतो 'इतका' हक्क HAL Share Price | HAL स्टॉक चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी सोडू नका Adani Port Share Price | मल्टिबॅगर अदानी पोर्ट्स शेअरची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार BCL Industries Share Price | शेअर प्राईस ₹57, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, शॉर्ट टर्ममध्ये ₹95 वर पोहोचणार SBI Mutual Fund | SBI योजनेत महीना रु.5000 बचत, मुलांच्या शिक्षण ते लग्नकार्यावेळी 55 लाख रुपये मिळतील My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून EPF कापला जातो? पहिलं स्कीम सर्टिफिकेट मिळवा, अन्यथा पेन्शन विसरा
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स खरेदीला तुफान गर्दी, स्टॉक चार्टवर सकारात्मक संकेत, यापूर्वी 565% परतावा दिला

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 46.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक तेजीत वाढतोय. या कंपनीला नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

सुझलॉन एनर्जी कंपनीला जुनिपर ग्रीन एनर्जीकडून 402 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे. सुझलॉन एनर्जी स्टॉक मंगळवारी 44.03 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज गुरूवार दिनांक 23 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.61 टक्के वाढीसह 47.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात कंपनीला मिळालेली ही पहिली ऑर्डर आहे. या नवीन ऑर्डर अंतर्गत, सुझलॉन एनर्जी कंपनीला 134 विंड टर्बाइन जनरेटरचा पुरवठा आणि स्थापना करण्याचे काम देण्यात आले आहे. हा प्रकल्प फतेहगड, राजस्थान येथे उभारला जाणार आहे. या क्षमतेचा प्रकल्प 3.30 लाख घरांना वीज पुरवठा करण्यासाठी सक्षम आहे. या प्रोजेक्टमुळे दरवर्षी 13 लाख टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. सुझलॉन एनर्जी कंपनी या प्रकल्पाचे ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स संबंधित काम देखील करणार आहे.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 46.23 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 2 वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 565 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.72 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.15 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 23 May 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(156)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x