24 October 2024 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत होऊनही शेअर घसरतोय, पुढे रॉकेट तेजी, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: NBCC NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, स्टॉक बाऊन्स बॅक करणार, कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

RVNL Share Price | PSU शेअरने 1 महिन्यात दिला 42% परतावा, स्वस्तात खरेदी करा, मोठा फायदा होईल

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. सोमवारी आरव्हीएनएल स्टॉक 5.99 टक्क्यांच्या वाढीसह 404 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आता हा स्टॉक आपल्या उच्चांक किमतीवरुन बराच खाली आला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 42 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी )

2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉक 123 टक्के मजबूत झाला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1200 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 5 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 6.26 टक्के घसरणीसह 329.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. नुकताच आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम म्हणजेच EPC निविदा प्राप्त झाली आहे.

या प्रकल्पात आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात औरंगाबाद-अंकाई दरम्यानच्या ट्रॅकचे दुपदरीकरण करण्याचे काम देण्यात आले आहे. यामध्ये विद्युतीकरण आणि सिग्नलिंगशी संबंधित काम केले जाणार आहे. मागील एका महिनाभरात आरव्हीएनएल कंपनीला अनेक ऑर्डर्स मिळाल्या आहेत. आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात जे काम देण्यात आले आहे, ते पूर्ण करण्यासाठी कंपनीला 30 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे एकूण मुल्य 440 कोटी रुपये आहे.

30 मे 2024 रोजी आरव्हीएनएल कंपनीने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून 38 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची माहिती दिली होती. हा प्रकल्प कंपनीला 15 महिन्यांत पूर्ण करायचा आहे. मे 2024 या महिन्यात आरव्हीएनएल कंपनीला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून 148 कोटी रुपये मूल्याची आणखी एक ऑर्डर मिळाली होती. यासह आरव्हीएनएल कंपनीने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या 6 उन्नत मेट्रो स्थानकांचे बांधकाम करण्यासाठी सर्वात कमी बोली लावली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 05 June 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(128)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x