20 May 2024 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही
x

Crompton Share Price | मल्टिबॅगर क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस

Crompton Share Price

Crompton Share Price | क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स आणखी 40 टक्के वाढू शकतात. पुढील काही दिवसांत या कंपनीचे शेअर्स 400 रुपये किंमत पार करतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधरने क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या शेअरवर 401 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स शेअर 285.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनीचे शेअर्स 1.81 टक्के वाढीसह 284.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअर बाजारातील 11 तज्ञांनी क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या शेअरवर 344.80 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा 20.73 टक्के अधिक आहे. मागील एका वर्षात क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के नकारात्मक दिला आहे.

2023 या वर्षात देखील क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स स्टॉक 17 टक्के कमजोर झाला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 384 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 251 रुपये होती. मागील आठवड्यात शुक्रवारी क्रॉमटन ग्रीव्हज कंपनीचे शेअर्स 3.20 टक्क्यांच्या घसरणीसह 285.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

जून 2023 तिमाहीमध्ये क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या प्रवर्तकांनी 5.94 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सप्टेंबर 2023 तिमाहीत प्रवर्तकांनी स्टॉक विकून आपले भाग भांडवल प्रमाण 2.54 टक्केवर आणले आहे. परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनी मधील आपला वाटा 35 टक्क्यांवरून वाढवून 35.66 टक्केवर नेला आहे.

देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी आपला गुंतवणूक वाटा 45.45 टक्क्यांवरून वाढवून 47.22 टक्केवर नेला आहे. क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनीमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी देखील आपली शेअर होल्डिंग 16.55 टक्केवरून वाढवून 17.12 टक्केवर नेली आहे.

क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनी शेअर धारकांना लाभांश वाटप करण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. क्रॉमटन ग्रीव्हज कंपनीने 7 जुलै 2023 रोजी आपल्या शेअर धारकांना 150 टक्के लाभांश वाटप केला होता. यापूर्वी, 2022 मध्ये क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना शेअरच्या दर्शनीमूल्यावर 125 टक्के लाभांश वाटप केला होता. 2021 मध्ये देखील कंपनीने शेअर धारकांना 125 टक्के लाभांश वाटप केला होता.

क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनीने 2020 मध्ये कोरोना काळात देखील आपल्या शेअर धारकांना 150 टक्के लाभांश दिला होता. तर 2019 मध्ये 100 टक्के लाभांश दिला होता. क्रॉप्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः घरगुती उपकरणे बनवण्याचे काम करते.

क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनीमध्ये म्युचुअल फंडानी मोठी गुंतवणूक केली होती. मात्र मागील तिमाहीत म्युचुअल फंडानी देखील आपले शेअर्स विकून शेअर होल्डिंग कमी केली आहे. नफा कमावण्यासाठी क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंझ्युमर इलेक्ट्रिकल्स कंपनीने भांडवलाच अकार्यक्षमपणें वापर केला होता.

त्यामुळे मागील 2 वर्षांत कंपनीच्या ROCE आणि ROE मध्ये घट पाहायला मिळाली आहे. याशिवाय मागील 2 वर्षांत कंपनीचा ROA, नेट कॅश फ्लो आणि कॅश इन हॅण्डमध्ये देखील घट पाहायला मिळाली आहे. याशिवाय कंपनीच्या निव्वळ नफ्यात किंचित घट नोंदवली गेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Crompton Share Price NSE 25 October 2023.

हॅशटॅग्स

Crompton Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x