
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच ‘टीटीएमएल’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एक वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबर दणका दिला होता. मात्र आज स्टॉकमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. मागील 3 दिवसांपासून टीटीएमएल स्टॉक तेजीत वाढत आहे.
टीटीएमएल स्टॉकने गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा
टीटीएमएल स्टॉकमध्ये पुन्हा अच्छे दिन आले आहे का? असा प्रश्न गुंतवणुकदारांना पडला आहे. एकेकाळी टीटीएमएल स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला होता. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 3.70 टक्के वाढीसह 81.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टीटीएमएल शेअरने 3 दिवसात 23 टक्के परतावा दिला
टीटीएमएल कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून सतत मंदी ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक तेजीत आला आहे. मागील 3 दिवसांत टीटीएमएल कंपनीचा स्टॉक 63.15 रुपयांवरून वाढून 80.90 रुपये किमतीवर पोहचला आहे. अवघ्या तीन दिवस हा स्टॉक 23 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल स्टॉक मध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते. शेअर सध्या आपल्या उच्चांक पातळीच्या तुलनेत खूप स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहे.
टीटीएमएल शेअरने 5 दिवसात 24.41 टक्के परतावा दिला
टीटीएमएल कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये 69.05 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसभरात हा स्टॉक 80.90 रुपये पर्यंत वाढला होता. मागील 5 दिवसात टीटीएमएल स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 24.41 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 17.63 टक्के खाली आली आहे. मागील एका वर्षात टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 36.36 टक्के कमजोर झाले आहेत. टीटीएमएल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 149 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 49.65 रुपये होती.
टीटीएमएल शेअरची एकूण कामगिरी
टीटीएमएल या टेलिकॉम कंपनीचे शेअर्स 7.34 रुपयेवरून वाढून 291 रुपयांपर्यंत पोहचले होते. 11 जानेवारी 2022 रोजी टीटीएमएल स्टॉक 291 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जानेवारी 2005 मध्ये टीटीएमएल कंपनी भारतीय टेलिकॉम बाजारात आघाडीची कंपनी बनली होती. टीटीएमएल कंपनीकडे 19 सर्कलमध्ये सेवा प्रदान करण्यासाठी युनिफाइड ऍक्सेस म्हणजेच मूलभूत आणि सेल्युलर सेवा परवाना आहे. आणि टीटीएमएल कंपनीकडे भारतामध्ये सेवा प्रदान करण्याचा राष्ट्रीय लांब अंतराचा परवाना देखील आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.