 
						Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस निर्माता कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी अचानक मोठी उसळी पाहायला मिळाली होती. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 940.55 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 374.35 रुपये होती. मागील 3 वर्षात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 2000 टक्केपेक्षा जास्त मजबूत झाले आहेत. आज बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के वाढीसह 917.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सची किंमत 42 रुपयांवरून वाढून 900 रुपयेच्या पार गेली आहे. 27 मार्च 2020 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 42.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 जून 2023 रोजी हा स्टॉक 940.55 रुपये किमतीवर पोहचला होता.
या काळातऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत लोकांना 2060 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 22.21 लाख रुपये झाले असते.
2023 मध्ये ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 75 टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहेत. 2 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 518.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 940.55 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील एका महिन्यात, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 36.74 टक्के वाढले आहेत.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला 1000 कोटी रुपयेच्या इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करण्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक ही मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची उपकंपनी आहे. या कंपनीला तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनकडून देखील 550 इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्याची 1000 कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		