 
						Jyoti Resins & Adhesives Share Price | शेअर मार्केटमधून कमाई करण्यासाठी संयम राखणे खूप गरजेचे आहे. शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी मागील काही वर्षात अप्या गुंतवणुकदरांचे पैसे 500x अधिक वाढवले आहेत. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या स्टॉकचे नाव आहे, ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ज्योती रेझिन्स अँड अडेसिव्हस कंपनीचे शेअर्स 1,394.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या काळात हा स्टॉक 27 रुपयेवरून वाढून 1394.60 रुपयेवर पोहचला आहे. 14 जून 2003 रोजी ज्योती रेझिन्स अँड अडेसिव्हस कंपनीचे शेअर्स 1,394.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी ज्योती रेझिन्स अँड अडेसिव्हस कंपनीचे शेअर्स 0.27 टक्के वाढीसह 1,396.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरची कामगिरी
14 जून 2003 रोजी ज्योती रेझिन्स अँड अडेसिव्हस कंपनीचे शेअर्स 27 पैशांवर ट्रेड करत होते. म्हणजेच मागील 20 वर्षात या स्टॉकने लोकांना 516196.3 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 4,856.35 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 28 रुपयांवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे.
त्याचप्रमाणे ज्योती रेझिन्स अँड अडेसिव्हज कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 73.66 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि YTD आधारे या स्टॉकने लोकांना 12.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यापासून या स्टॉकवर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे, म्हणून स्टॉक फक्त 0.20 टक्के वाढला आहे.
गुंतवणुकीवर परतावा
जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी ज्योती रेझिन्स अँड अडेसिव्हज कंपनीच्या शेअरमध्ये 27 पैसे किमतीवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 51 कोटी रुपये झाले असते. जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 50 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		