29 April 2024 6:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

ICICI Mutual Funds | बाब्बो! या म्युच्युअल फंड योजना 14 पट पैसा वाढवत आहेत! लिस्ट सेव्ह करा आणि पैसे लावा

ICICI Mutual funds

ICICI Mutual Funds | मागील एका वर्षभरात भारतीय गुंतवणूक बाजारपेठेत बरीच अस्थिरता आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळेल आहे. शेअर्स बाजारातून परकीय गुंतवणूकदारांची झालेली माघार, रशिया आणि युक्रेनमधील भयानक युद्ध, तसेच जगात वाढती महागाई आणि आर्थिक मंदी यांनी जगभरातील सर्व शेअर बाजारांवर विक्रीचा दबाव निर्माण केला आहे. भारतीय शेअर बाजाराचे प्रदर्शन पाहिलं तर, या कालावधीत बीएसई सेन्सेक्सने आपल्या गुंतवणुकदारांना फक्त 1.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर या काळात म्युचुअल फंड बाजारात अशा काही योजना आल्या आहेत ज्यांनी लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. आज आपण ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

गुंतवणूक तज्ञांनी तुमच्या साठी ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या 7 जबरदस्त योजनांची निवड केली आहे, ज्यांनी लोकांना 14 ते 20 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच, या म्युचुअल फंड योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना बेंचमार्कपेक्षा 14 पट अधिक नफा मिळवून दिला आहे. 13 जुलै 2022 पर्यंतच्या मार्जिन डेटानुसार, ICICI प्रुडेन्शियल म्युचुअल फंडच्या ज्यां योजनांनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 14 ते 20 टक्के परतावा दिला आहे, त्यात भारत कन्झम्पशन फंड, इक्विटी आणि डेट, मल्टी अॅसेट, रिटायरमेंट प्युअर इक्विटी फंड आणि FMCG फंड यां योजनांचा समावेश होतो. म्युच्युअल फंड तज्ञामध्ये या फंड हाऊसची प्रतिमा अशी आहे की, योजनांना कमी परतावा देण्यापासून रोखणे हे त्याचे मुख्य धोरण आहे. मागील एक वर्षापासून ICICI प्रुडेन्शियल म्युचुअल फंड हाऊसने व्हॅल्यू इंवेस्टमेन्ट धोरण अवलंबले आहे.

अनिश्चिततेच्या काळात खात्रीशीर परतावा :
ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या अनेक योजनांनी आपल्या गुंतवणुकदारांना 7 ते 13 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे. यामध्ये मुख्यतः लार्ज अँड मिड कॅप फंड, इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड, डिव्हिडंड यील्ड इक्विटी फंड, व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड आणि एमएनसी फंड यांनी आपल्या सामाईक श्रेणीपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. फंड हाऊसचे अधिकारी म्हणतात की, “आमचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. आम्ही वीज आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये आणि एफएमसीजीमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. तसेच धातूंमधील गुंतवणूक कमी केली आहे. आम्ही अजूनही गुंतवणूकदारांना सल्ला देत आहोत, की एसआयपी आणि एसटीपीमध्ये गुंतवणूक करावी. आम्ही सातत्याने वेगवेगळ्या मालमत्ता वर्गाशी संबंधित असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करत आहोत”.

1 वर्षात बंपर परतावा देणाऱ्या योजनांची लिस्ट :
* ICICI प्रुडेन्शियल FMCG फंड : 20.07 टक्के
* ICICI प्रुडेन्शियल रिटायरमेंट प्युअर इक्विटी फंड : 19.10 टक्के
* ICICI प्रुडेन्शियल भारत कंझम्पशन फंड : 16.36 टक्के
* ICICI प्रुडेन्शियल मल्टी अॅसेट फंड : 14.87 टक्के
* ICICI प्रुडेंशियल इक्विटी आणि डेट फंड : 14.21 टक्के
* ICICI प्रुडेन्शियल इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड : 12.42 टक्के
* ICICI प्रुडेन्शियल लार्ज आणि मिड कॅप फंड : 11.50.टक्के
* ICICI प्रुडेन्शियल डिव्हिडंड यील्ड इक्विटी फंड : 10.75 टक्के
* ICICI प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड : 10.52 टक्के
* ICICI प्रुडेन्शियल एमएनसी फंड : 7.00 टक्के

इतका परतावा मिळण्याच्या मागे स्थिर गुंतवणूक प्रक्रियेचा अवलंब करणे हे धोरण आहे. या म्युचुअल फंडाने स्वतःला आपल्या चौकटीत बसत नसलेल्या सेक्टरपासून दूर ठेवले आहे. जागतिक बाजारपेठेत भारतीय स्टॉक मक्रेत अजूनही मजबूत स्थितीत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| ICICI Mutual funds Scheme for investment and earning huge money on 19 November 2022

हॅशटॅग्स

ICICI Mutual funds(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x