12 December 2024 5:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

IRFC Share Price | 1 वर्षात 500% परतावा देणारा मल्टिबॅगर IRFC शेअर BUY, Sell की Hold करावा?

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एका वर्षभरापूर्वी या रेल्वे स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 6 लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. या कालावधीत हा रेल्वे स्टॉक 500 टक्के वाढला आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )

तज्ञांनी नुकताच आयआरएफसी स्टॉकचे विश्लेषण करून गुणवत्ता, मूल्यांकन आणि तांत्रिक गुणांनुसार स्टॉकला गुण दिले आहेत. या स्टॉकने गुणवत्तेच्या बाबतीत 100 पैकी 77 गुण मिळवले आहेत. याचा अर्थ हा स्टॉक अजूनही मजबूत स्थितीत आहे. मुल्यांकनाच्या बाबतीत या स्टॉकला 100 पैकी 25 गुण मिळाले आहेत. तर तांत्रिक आधारावर या शेअरला 100 पैकी 74 गुण मिळाले आहेत. आज बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 3.39 टक्के वाढीसह 202.48 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आर्थिक आघाडीवर आयआरएफसी स्टॉकला 2 सकारात्मक आणि 6 नकारात्मक गुण आहेत. तर मालकीच्या बाबतीत 2 सकारात्मक आणि 1 नकारात्मक गुण मिळाला आहे. मूल्य आणि मोमेंटमच्या बाबतीत आयआरएफसी कंपनीला 4 सकारात्मक आणि 4 नकारात्मक गुण मिळाले आहे. जर आपण रिस्क मीटरनुसार आयआरएफसी स्टॉकचे विश्लेषण केले तर तुम्हाला समजेल की, हा स्टॉक 64 टक्के अधिक जोखमीवर आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी शेअर 209.80 रुपये किमतीवर ओपन झाला होता. तर दिवसभरात हा स्टॉक 213.24 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहोचला होता.

मागील 5 दिवसात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 98 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात आयआरएफसी स्टॉक आतापर्यंत 97 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 500 टक्केपेक्षा जास्त वाढली आहे. जानेवारी 2021 पासून आतापर्यंत आयआरएफसी स्टॉक तब्बल 700 टक्के वाढला आहे. केडिया कॅपिटल्स फर्मच्या तज्ञांनी आयआरएफसी स्टॉक तत्काळ खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक 198 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक अल्पावधीत 265 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 10 July 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(110)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x