30 April 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस?
x

Loan Documents Requirement | कोणतंही कर्ज घेण्यासाठी लागतात ही कागदपत्रं, झटकन काम होण्यासाठी ही कागदपत्रं शॉर्टलिस्ट करा

Loan Documents Required

Loan Documents Required | एखादी मोठी वस्तू खरेदी करायची असल्यास अनेक जण यासाठी शुभमुहूर्ताची वाट पाहतात. दिवाळी, दसरा अशा सणांनचे औचित्य साधत अनेक मंडळी विविध वस्तूंची खरेदी करतात. यात कोणी घर, जमिन तर काही जण टिव्ही, लॅपटॉप अशा वस्तू खरेदी करतात.

महागड्या वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यावर आपल्याकडे लगेचच एवढे पैसे नसतात. त्यामुळे अनेक व्यक्ती बॅंकेत धाव घेतात. अशात बॅंक देखील तुम्ही अर्ज केल्या केल्या तुम्हाला कर्ज देते असे नाही. यात आधी तुम्हाला काही कागदपत्रांची निट पूर्तता करावी लागते. आवश्यक ती कागदपत्रे जमा केल्यानंतरच तुम्हाला कर्ज दिले जाते.

त्यामुळे तुम्ही देखील कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे हे जाणून घेऊ. जर कर्ज लवकर हवे असेल तर लागणारे कागदपत्र देखील वेळेत द्यावे लागतात. यासाठी दिरंघाई करता येत नाही. अशात ऐन वेळी गोष्टी न सापडणे किंवा गहाळ होणे असे प्रकार घडत असतात. त्यामुळे आधीच याची माहिती ठेवा.

ओळखपत्र आवश्यक
कर्ज मिळवण्यासाठी सर्वात आधी तुमचे ओळखपत्र तपासले जाते. यात तुम्हाला वोटिंग कार्ड, आधार कार्ड. पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन, तुमच्या कामाच्या ठिकाणचा आयडी, पासपोर्ट अशी कागदपत्रे जमा करावी लागतात. यातील सर्वच गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत असे नाही. यापैकी तुमच्याकडे जे जे आहे ते बॅंकेला दाखवावे लागते.

नोकरदार वर्गासाठी लागणारी कागदपत्रे
* सॅलरी स्लीप ( मागिल तिन महिन्यांची )
* आयडी डिपार्टमेंट कडून मिळणारे IT रिटर्न ड्युटी ऍक्नॉलोजमेंट
* फॉर्म क्रमांक १६ ( मागिल दोन वर्षांचा )
* बॅंक अकाउंट स्टेटमेंट (मागिल सहा महिन्यांचे )

व्यवसायीकांना लागणारी कागदपत्रे
* आयटी रिटर्न (मागिल ३ वर्षांचा)
* कंपनी रजिस्टेशन लायसन
* टॅक्स रजिस्टेशन कॉपी
* गेल्या वर्षापासूनचे बॅंक स्टेटमेंट

ही कागदपत्रे पुर्ण देणे तसेच हमीसाठी बॅंकेकडे तुम्ही ज्यासाठी लोन काढत आहात त्याची हमी देणे असे सर्व डॉक्यूमेंट वेळेत भरावे लागतात. यातील एकजरी कागद नसेल तर लोन मिळत नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Loan Documents Required This document is required if you are taking a loan 29 October 2022.

हॅशटॅग्स

Loan Documents Required(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x