18 May 2024 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला
x

Tata Consumer Products Share Price | टाटा म्हणजे नो घाटा! टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा

Tata Consumer Products Share Price

Tata Consumer Products Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली होती. या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स स्टॉक 5.50 टक्क्यांच्या वाढीसह 864.80 रुपये या आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता.

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीच्या स्टॉकमध्ये मागील तीन महिन्यांपासून मंदी पाहायला मिळत होती. 16 मार्च 2023 रोजी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स 685 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स स्टॉक 0.23 टक्के वाढीसह 864.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टॉक वाढीचे कारण
टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स शेअरमधील तेजीचे सर्वात मोठे कारण म्हणजे, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीची मार्च 2023 तिमाहीमधील कामगिरी आहे. कंपनीने आपले तिमाही निकाल 25 एप्रिल 2023 रोजी जाहीर केले होते. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीचा निव्वळ नफा 21 टक्क्यांच्या वाढीसह 289.6 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

मागील वर्षीच्या याच तिमाहीत टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीने 239 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 तिमाहीत कंपनीच्या ऑपरेशन्समधील महसूलात 14 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 3,619 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत कंपनीने 3,175 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधरच्या तज्ज्ञांच्या मते, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीने एफएमसीजी क्षेत्रात आपली स्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीने अनेक अधिग्रहण करून विविध उदिग विभागांमध्ये विस्तार केला आहे. ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की टाटा कंझ्युमर स्टॉकमध्ये हा ट्रेंड असाच चालू राहणार आहे. ब्रोकरेज फर्मने टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 1000 रुपयेवर जाऊ शकतो.

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स स्टॉकवर 910 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ICICI सिक्युरिटीज फर्मने या स्टॉकवर 900 रुपये लक्ष किंमत जाहीर करून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय ब्रोकरेज फर्म निर्मल बंगनेही हा स्टॉक 900 रुपये पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

व्हीपी, इंक्रेड इक्विटीज यांच्या मते, साप्ताहिक चार्टवर टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स स्टॉक दोन वर्षांच्या वेज पॅटर्नमधून ब्रेकआउटचे संकेत देत आहे. पुढील आठवड्यात हा स्टॉक 1000 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांच्या मते हा स्टॉक दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मजबूत नफा देऊ शकतो. काही तज्ञ मात्र टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स स्टॉकमधील अचानक उसळी लक्षात घेऊन सावध भूमिका घेत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Consumer Products Share Price today on 15 June 2023.

हॅशटॅग्स

#Tata Consumer Products Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x