14 December 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या
x

Stock To Buy | अल्पावधीत कमाई करा! मिश्र धातु निगम शेअरने मागील 1 महिन्यात 28 टक्के परतावा दिला, पुढे अजून सुसाट कमाई

Stock To Buy

Stock To Buy | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकीसाठी एक PSU स्टॉक निवडला आहे. या कंपनीचे नाव आहे, मिश्र धातु निगम लिमिटेड. मागील तीन महिन्यांत मिश्र धातु निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के नफा कमावून दिला आहे.

मिश्र धातू निगम लिमिटेड या सरकारी मालकीच्या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला मिनीरत्न दर्जा प्राप्त आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 403 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 172 रुपये होती. सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी मिश्र धातु निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के वाढीसह 392.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 10 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 27 टक्के, आणि मागील तीन महिन्यांत 65 टक्के, तर सह 80 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 112 टक्के आणि मागील तीन वर्षात 85 टक्के परतावा कमावून दिला आहे. मिश्र धातू ही कंपनी मुख्यतः विशेष स्टील आणि सुपर मिश्र धातु तयार करण्याचे काम करते. मिश्र धातु निगम लिमिटेड ही कंपनी मुख्यतः स्पेशल स्टील, सुपर अलॉय आणि टायटॅनियम तयार करणारी भारतातील एकमेव कंपनी मानली जाते.

मिश्र धातु निगम लिमिटेड ही कंपनी ओपन डाय फोर्जिंग, इन्व्हेस्टमेंट कास्टिंग, आर्मर्ड उत्पादने आणि फास्टनर्स, वेल्डिंग उपभोग्य वस्तूचे उत्पादन करण्याचा व्यवसाय देखील करते. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या एकत्रित महसूलात 6.9 टक्के CAGR दराने वाढ झाली आहे. यासोबत कंपनीचा EBITDA दर 9.2 टक्के CAGR वाढला होता.

8 ऑगस्ट 2023 रोजी मिश्र धातु निगम लिमिटेड कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. याकाळात कंपनीने 188 कोटी रुपयेची उलाढाल केल्याची माहिती तिमाही निकालात दिली आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात 63.33 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर कंपनीचे उत्पादन मूल्य 26.53 टक्के वाढीसह 295 कोटी रुपये नोंदवले गेले.

कंपनीचा EBITDA 22.64 टक्के वाढीसह 49.56 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर जून तिमाहीत कंपनीचा करपूर्व नफा 14.23 टक्क्यांच्या वाढीसह 26.73 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 4.75 टक्के वाढ झाली आहे. आणि कंपनीने 18.54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मिश्र धातु निगम लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 1.68 रुपये लाभांश वाटप केला आहे.

1 जुलै 2023 रोजी मिश्र धातु निगम लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 1408 कोटी रुपये होता. ब्रोकरेज फर्म ICICI Direct ने मिश्र धातु निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स स्टॉक 12-15 महिन्यांसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मिश्र धातु निगम लिमिटेड कंपनी विविध धोरणात्मक साहित्य बनवण्याचे काम करते. कंपनीची उत्पादन क्षमता देखील मजबूत आहे. पुढील काळात कंपनीची संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील सामरिक सामग्रीची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

मिश्र धातु निगम लिमिटेड ही कंपनी व्यवसाय विस्तार करण्यासाठी संरक्षण, एरोस्पेस, रेल्वे आणि ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. या क्षेत्रातून कंपनीच्या सुपर अलॉय आणि टायटॅनियम उत्पादनाची मागणी मोठी आहे. पुढील काळात कंपनीची ऑर्डर बुक मजबूत राहील असे तज्ञ म्हणतात. आर्थिक वर्ष 2023-25 दरम्यान या कंपनीच्या निव्वळ नफ्यात 18 टक्के आणि महसूलात 20 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते हा कंपनीचे शेअर्स पुढील काळात 465 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stock To Buy for investment on 21 August 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x