
Wipro Share Buyback | भारतातील सर्वात मोठ्या दिग्गज IT कंपनीपैकी एक विप्रो कंपनीने शेअर्स बायबॅकची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 16 जून 2023 हा दिवस निश्चित केला आहे. विप्रो कंपनीच्या बायबॅकचा आकार 12,000 कोटी रुपये आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विप्रो कंपनीचे शेअर्स 1.93 टक्के घसरणीसह 388.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.20 टक्के घसरणीसह 380.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
विप्रो बायबॅक तपशील :
1) विप्रो कंपनीने आपले शेअर्स बायबॅक करण्यासाठी 445 रुपये प्रति शेअर किंमत जाहीर केली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमधील किमतीच्या तुलनेत ही किंमत 64 रुपये अधिक आहे. म्हणजेच प्रत्येक शेअरवर गुंतवणुकदारांना 15 टक्के पेक्षा जास्त नफा मिळणार आहे.
2) विप्रो कंपनीचे प्रवर्तक आणि गुंतवणुकदार गटाने या बायबॅकमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे.
3) मार्च 2023 तिमाहीच्या अखेरीस कंपनीच्या प्रवर्तक आणि गुंतवणुकदार गटाकडे विप्रो कंपनीचे 400.19 कोटी शेअर्स आहेत, ज्याचे प्रमाण एकूण भाग भांडवलाच्या 72.92 टक्के आहे.
4) विप्रोने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की बायबॅकद्वारे कंपनी आपली अतिरिक्त रोकड गुंतवणूकदारांना वितरित करण्यास सक्षम असेल .
5) विप्रो कंपनीच्या बायबॅक योजनेत किरकोळ गुंतवणूकदारांकडून स्टॉक खरेदी करण्यासाठी 15 टक्के रक्कम राखीव ठेवण्यात आली आहे.
कंपनीची कामगिरी
मागील एका वर्षभरात विप्रो कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6.12 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. स्टॉक रिकव्हरीच्या दृष्टीने विप्रो कंपनीसाठी मागील एक महिना फार्स चांगला नव्हता. या कालावधीत विप्रो कंपनीच्या शेअरने लोकांना 0.50 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. विप्रो कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 450.65 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 351.85 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.