10 May 2024 9:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

Olectra Share Price | रिलायन्ससोबत भागीदारी! ऑर्डरबुक मजबूत, तज्ज्ञांकडून मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाहीर

Olectra Share Price

Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. आज या कंपनीच्या शेअर्सने आपली वार्षिक उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 10.70 टक्क्यांच्या वाढीसह 1,493.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्सने 374.35 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवरून गुंतवणुकदारांना 298.96 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 4.42% टक्के वाढीसह 1,517 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील वर्षी 23 फेब्रुवारी 2024 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 375 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र आता या कंपनीचे शेअर्स 1500 रुपये किमतीच्या पार गेले आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला इलेक्ट्रिक बसेसच्या डिलिव्हरीची मोठी ऑर्डर मिळाली होती.

हायड्रोजन बसच्या निर्मितीसाठी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीसोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स तेजीत आले. सध्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये 9000 पेक्षा अधिक बसची ऑर्डर प्रलंबित आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत कंपनीने 232 बसेस यशस्वीपणे वितरित केल्या होत्या. सध्या कंपनी आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत आपली वितरण संख्या दुप्पट करण्यावर भर देत आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 1,570-1,690 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, या स्टॉकची सपोर्ट लेव्हल 1,400 रुपये असून ब्रेकआउट लेव्हल 1,500 रुपये किमतीवर आहे.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या प्रवर्तकांनी सप्टेंबर 2023 पर्यंत कंपनीचे जवळपास 50.02 टक्के भाग भांडवल धारण केले होते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक ही कंपनी मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची उपकंपनी आहे. ही कंपनी भारतात इलेक्ट्रिक बसेसचे उत्पादन करते. यासह ओलेक्ट्रा कंपनी ही वीज पारेषण आणि वितरण नेटवर्कसाठी सिलिकॉन रबर तसेच कंपोझिट इन्सुलेटर बनवणारी भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Olectra Share Price NSE Live 08 January 2024.

हॅशटॅग्स

Olectra Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x