20 May 2024 9:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्समध्ये तेजी येणार? कंपनीने घेतला मोठा निर्णय, तपशील जाणून टाटा स्टील शेअर्स खरेदी करा

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनी चालू आर्थिक वर्षात आपल्या देशांतर्गत आणि जागतिक व्यापारामध्ये 16,000 कोटी रुपये एकात्मिक भांडवली गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.

टाटा स्टील कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने माहिती दिली की, टाटा स्टील कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक टीव्ही नरेंद्रन आणि कार्यकारी संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी कौशिक चॅटर्जी यांनी एकूण गुंतवणूक रकमेतील 10,000 कोटी रुपये स्टँडअलोन ऑपरेशन्सवर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 2,000 कोटी रुपये टाटा स्टील कंपनीच्या उपकंपन्यांवर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के वाढीसह 114.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा स्टील कंपनीच्या 2022-23 च्या वार्षिक अहवालात माहिती देण्यात आली आहे की, “2023-24 या आर्थिक वर्षात टाटा स्टील कंपनी 16,000 कोटी रुपये भांडवली गुंतवणुक करणार आहे. टाटा स्टील कंपनी अंतर्गत संसाधनांमधून या गुंतवणुकीला वित्तपुरवठा करणार आहे.

10,000 कोटी रुपये स्टँडअलोन ऑपरेशन्सवर खर्च करणार

यापैकी 10,000 कोटी रुपये टाटा स्टील कंपनीच्या स्टँडअलोन ऑपरेशन्सवर खर्च करणार आहे. यातील 70 टक्के रक्कम कंपनी कलिंगनगर प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणार आहे. टाटा स्टील कंपनी ओडिशातील कलिंगनगरमधील स्टील प्लांटची क्षमता 3 दशलक्ष टन वरून वाढवून 8 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याची तयारी करत आहे.

टाटा स्टील शेअर कामगिरी

टाटा स्टील स्टॉक सध्या आपल्या 4 महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. जागतिक बाजारात स्टील कंपनीची मागणी वाढण्याची अपेक्षा असल्याने, टाटा स्टील कंपनीला याचा फायदा होऊ शकतो. IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकवर 124 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. सर्व बाबीचा विचार करून तज्ञांनी स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price today on 20 June 2023.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x