3 May 2025 10:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Best Agrolife Share Price | बेस्ट अॅग्रोलाइफ गुंतवणुकदार करोडपती झाले, अवघ्या 44000 रुपयेवर मिळाला करोडोचा परतावा, डिटेल्स पाहा

Best Agrolife Share Price

Best Agrolife Share Price | बेस्ट अॅग्रोलाइफ या कीटकनाशकांचे उत्पादन करणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये जवळपास 31.23 टक्के खाली आले आहेत. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 119.36 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरच्या सर्वकालीन नीचांक आणि उच्चांक किंमत पातळी सोबत तुलना केली तर, आपल्या समजेल की मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अवघ्या 41,000 रुपये गुंतवणुकीवर करोडपती बनवले आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्य बेस्ट ऍग्रोलाइफ कंपनीचे शेअर 0.46 टक्के वाढीसह 1043.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के वाढीसह 1,047.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

करोडपती स्टॉक

बेस्ट अॅग्रोलाइफ कंपनीचे शेअर्स 22 जून 2018 रोजी 4.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 1047 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. दरम्यान या कंपनीचे शेअर्स 1775 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. ज्या लोकांनी 2018 मध्ये बेस्ट अॅग्रोलाइफ कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, ते लोक शेअरची किंमत उच्चांक पातळीवर असताना करोडपती झाले असते. म्हणजेच अवघ्या पाच वर्षात 41 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर शेअर धारकांना करोडो रुपये नफा मिळाला असता.

या काळात शेअरची किंमत 24745 टक्के वाढली आहे. मागील वर्षी 1 जुलै 2022 रोजी बेस्ट अॅग्रोलाइफ स्टॉक 798.60 रुपये या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. मागील पाच महिन्यांत हा स्टॉक 122 टक्क्यांच्या वाढीसह 1774.45 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांकावर पोहोचला होता. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांकावरून 41 टक्के खाली ट्रेड करत आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात

बेस्ट अॅग्रोलाइफ ही कंपनी मुख्यतः कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके आणि वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारे फवारणी औषध बनवण्याचे काम करते. कंपनी कीटक, तण, पिकांना हानी पोहोचवणारी बुरशी, तसेच वनस्पतींच्या वाढीला गती देणारी उत्पादने नष्ट करण्यासाठी लागणारे उत्पादन बनवण्याचे काम करते. या कंपनीचे औषध आणि उत्पादन वस्तू जगभरात विकले जातात.

मार्च 2023 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. तर डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीने 9.20 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 तिमाहीत बेस्ट अॅग्रोलाइफ कंपनीला 32.44 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. तर मार्च तिमाहीत बेस्ट अॅग्रोलाइफ कंपनीच्या प्रवर्तकानी आपला हिस्सा 48.20 टक्क्यांवरून वाढवून 50.10 टक्क्यांवर नेला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Best Agrolife Share Price today on 21 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Best Agrolife Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या