18 May 2024 3:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
x

Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप स्टॉकची तेजी थांबली? स्टॉक घसरणीचे कारण काय? गुंतवणूकदारांनी काय करावे?

Brightcom Group Share Price

Brightcom Share Price | मागील काही दिवसांपासून ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये सुरू असलेल्या तेजीमध्ये खंड पडला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 10.50 टक्क्यांच्या घसरणीसह 33.32 रुपये किमतीचा एर ट्रेड करत होते. त्यापूर्वीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 35.07 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Brightcom Group Share Price)

ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने 9.27 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीच्या तुलनेत 259.44 टक्के वाढ नोंदवली आहे. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 31.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Brightcom Share)

शेअरची कामगिरी

मे 2023 महिन्यापासून आतपर्यंत ब्राइटकॉम ग्रुप स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील 14 दिवसांपासून सुरू असलेल्या रॅलीमध्ये 16 पैकी 14 ट्रेडिंगमध्ये स्टॉक अप्पर सर्किटवर क्लोज झाला होता. मागील एका महिन्यात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 93.23 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील पाच वर्षांत 1,493.91 टक्के परतावा दिला

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 14.21 टक्के खाली आली होती. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी गुंतवणूक केलेल्या ब्राइटकॉम गृप स्टॉकने मागील पाच वर्षांत लोकांना 1,493.91 टक्के नफा कमावून दिला आहे. शंकर शर्मा यांनी मार्च 2023 पर्यंत ब्राइटकॉम गृप कंपनीचे 1.24 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

एप्रिल 2020 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत इनसाइडर ट्रेडिंगशी संबंधित नियामक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सेबीने ब्राइटकॉम ग्रुप आणि त्याच्या प्रवर्तकांना 40 लाख रुपये दंड आकारला होता. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने गीता कंचर्ला यांना 12 लाख रुपये दंड आकारला आहे. तर विजय कुमार कंचर्ला एचयूएफ, विजय कुमार कंचर्ला, एम सुरेश कुमार रेड्डी आणि एसव्ही राज्यलक्ष्मी यांच्यावर प्रत्येकी 6 लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. यासह रेड्डी आणि ब्राइटकॉम ग्रुप कंपनीला सेबीने प्रत्येकी पाच लाख रुपये दंड भरण्याचा आदेश दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Brightcom Group Share Price today on 23 June 2023

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x