14 December 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा Railway Ticket Booking | प्रवाशांनो इकडे लक्ष द्या; तात्काळ तिकीट बुकिंगचे टायमिंग बदलले, तिकिटांची नवीन वेळ जाणून घ्या
x

Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत, अल्पावधीत दिला 60 टक्के परतावा

Mankind Pharma Share Price

Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.89 टक्के वाढीसह 1,732.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स मे 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंग झाल्यावर मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे.

मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 1080 रुपये निश्चित करण्यात आली होती. तर आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स 2.23 टक्के घसरणीसह 1,708.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मने मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. मॅनकाइंड फार्मा ही भारतातील प्रसिद्ध फार्मा कंपनी आहे. कंपनीचे मूलभूत तत्त्व मजबूत असून गुंतवणूक करण्यायोग्य आहे. त्याच वेळी भारतीय ग्राहक आणि गुंतवणूकदारांमध्ये मॅनकाइंड फार्मा कंपनी प्रसिद्ध आहे. यूएसमधील काही निरीक्षकांनी भारतीय फार्मा कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कारखान्यांमध्ये व्यापक समस्याची पोलखोल केली होती.

मॅनकाइंड फार्मा कंपनीची एकूण विक्रीपैकी 97 टक्के विक्री फक्त भारतात होते. इतर स्पर्धक कंपन्याच्या तुलनेत मॅनकाइंड फार्मा कंपनीने सर्वाधिक मार्केट काबीज केला आहे. त्याच्या देशांतर्गत विक्रीपैकी सुमारे 8 टक्के विक्री कंडोम विक्री आणि ग्राहक आरोग्य सेवातून येते. 1.4 अब्ज लोकसंख्येच्या देशात कंडोम विक्री आणि ग्राहक आरोग्य सेक्टर सर्वात मोठा बाजार मानला जातो.

मॅनकाइंड फार्मा कंपनीला मागील 12 वर्षांमध्ये इतर नवीन IPO स्टॉकच्या तुलनेत सर्वोच्च कव्हरेज प्राप्त झाले होते. मे 2023 महिन्यामध्ये मॅनकाइंड फार्मा स्टॉकच्या ब्लॉकबस्टर एंट्रीनंतर औषधे आणि कंडोम बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्समध्ये खरेदीचे प्रमाण आणखी वाढले.

मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या शेअर्सवर अनेक तज्ञांनी ‘बाय’ देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्लूमबर्ग फर्मने जारी केलेल्या अहवालानुसार नोव्हेंबर 2010 नंतर 500 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त भांडवल उभारणी केलेल्या भारतीय स्टॉकला मिळालेला हा सर्वोच्च प्रतिसाद आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mankind Pharma Share Price today on 21 June 2023.

हॅशटॅग्स

#Mankind Pharma Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x