25 May 2024 2:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रासह हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंगसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 10 पेनी स्टॉक खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हीट Vodafone Idea Share Price | अप्पर सर्किटनंतर पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार, मिळेल 80 टक्केपर्यंत परतावा Adani Port Share Price | ब्रेकआऊटचे संकेत! तज्ज्ञांकडून अदानी पोर्ट्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मोठी कमाई होणार SBI Special FD Interest | SBI ग्राहकांसाठी खुशखबर! खास FD वर मिळेल मोठा व्याजदर, मिळेल तगडा परतावा Quant Mutual Fund | शेअर्स नव्हे! या आहेत मालामाल करणाऱ्या म्युच्युअल फंड योजना, सेव्ह करून ठेवा यादी My EPF Money | पगारदारांनो! EPF खात्यात पैसे असतील तर हे लक्षात घ्या, अन्यथा पसे काढताना अडचणी येतील
x

IKIO Lighting Share Price | IKIO लायटिंग कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाले, अवघ्या 6 दिवसात गुंतवणूकदारांना दिला मजबूत परतावा

IKIO Lighting Share price

IKIO Lighting Share Price | आयकेआयओ लायटिंग या LED लाइटिंग सोल्यूशन्स निर्माता कंपनीचे शेअर्स नुकताच स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सने मागील 6 दिवसांत आपल्या आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना मालामाल केले आहे.

आयकेआयओ लायटिंग कंपनीचे IPO शेअर्स 285 रुपये अप्पर किंमत बँडवर वाटप करण्यात आले होते. आयकेआयओ लायटिंग कंपनीचे शेअर्स 16 जून 2023 रोजी 391 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.87 टक्के वाढीसह 464.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयकेआयओ लायटिंग कंपनीचा IPO 6 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर हा IPO 8 जून 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होता. या कंपनीच्या IPO मध्ये शेअर्स 285 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. आयकेआयओ लायटिंग कंपनीचे शेअर्स 23 जून 2023 रोजी 7 टक्के वाढीसह 477.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयकेआयओ लायटिंग कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 446.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आयकेआयओ लायटिंग कंपनीचा IPO एकूण 67 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या IPO चा रिटेल कोटा 14.31 पट सबस्क्राइब झाला होता. तर , गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 65.38 पट सबस्क्राईब झाला होता. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 163.06 पट सबस्क्राईब झाला होता. आयकेआयओ लायटिंग कंपनीने आपल्या IPO च्या माध्यमातून एकूण 606.50 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये किमान 1 लॉट आणि कमाल 13 लॉटवर पैसे लावू शकत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IKIO Lighting Share price today on 24 June 2023.

हॅशटॅग्स

IKIO Lighting Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x