
Paytm Share Price | पेटीएम कंपनीच्या शेअस धारकांसाठी एक बातमी आली आहे. 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 90 टक्के वाढल्यानंतर ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरीने पेटीएम स्टॉकची रेटिंग कमी केली आहे. ब्रोकरेज हाऊसने पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरची रेटिंग आउटपरफॉर्मर वरून कमी करून न्यूट्रल केली आहे.
ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरीने पेटीएम कंपनीच्या शेअर्सची लक्ष किंमत देखील कमी करून 800 रुपये जाहीर केली आहे. आज बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 1.93 टक्के वाढीसह 854.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
स्टॉकबाबत ब्रोकरेज हाऊसचे मत
मॅक्वेरी फर्मने पूर्वी पेटीएम कंपनीच्या शेअरवर सकारात्मक रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता त्यांनी स्टॉकची रेटिंग डाऊनग्रेड केली आहे. ब्रोकरेज हाऊसने काही महिन्यांपूर्वी पेटीएम स्टॉकची रेटिंग अंडरपरफॉर्म वरुन वाढवून आउटपरफॉर्म केली होती. आणि स्टॉकची लक्ष किंमत देखील 450 रुपयेवरून 800 रुपये वाढवली होती.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पेटीएम कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 858 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पेटीएम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 439,60 रुपये होती. तर पेटीएम शेअर्सची 52 आठवडयाची उच्चांक किंमत पातळी 915 रुपये होती.
शेअरची कामगिरी
पेटीएम कंपनीचे शेअर्स आपल्या नीचांक किंमत पातळीवरुन 90 टक्के पेक्षा अधिक वाढले आहेत. 24 नोव्हेंबर 2022 रोजी पेटीएम स्टॉक 439.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर 27 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 858 रुपये किमतीवर पोहचले होते. या कालावधीत पेटीएम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 90 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 6 महिन्यांत पेटीएम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 59.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात पेटीएम कंपनीच्या शेअरने लोकांना 21.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. अँट फायनान्शियल कंपनी आपले 25 टक्के पेटीएम स्टॉक खुल्या बाजारात विकणार आहे. रिलायंस इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये होणारी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या स्पर्धक कंपनीची घोषणा पेटीएम स्टॉकसाठी दणका ठरू शकते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.