15 December 2024 7:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Polyplex Corporation Share Price | हा 11074% परतावा देणारा शेअर स्वस्त झालाय, स्टॉक डिटेल्स पहा

Polyplex Corporation Share Price

Polyplex Corporation Share Price | ‘पॉलिप्लेक्स कॉर्पोरेशन’ या प्लास्टिक फिल्म बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सची अवस्था फार बिकट झाली आहे. शेअर बाजारात किंचित तेजी असूनही शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर NSE इंडेक्सवर 0.37 टक्के घसरणीसह 1551 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘पॉलीप्लेक्स कॉर्प’चे शेअर्स मागील एका महिन्यात 7 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के घसरणीसह 1538.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला होता. या कंपनीच्या शेअर मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 11074 टक्क्यांनी वाढवले ​​आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Polyplex Corporation Share Price | Polyplex Corporation Stock Price | BSE 524051)

शेअरची किंमत वाढ :
31 जानेवारी 2003 रोजी ‘पॉलिप्लेक्स कॉर्पोरेशन’ या कंपनीचे शेअर्स 13.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र सध्या या कंपनीचे शेअर्स 112 पटीने वाढले असून शेअरची किंमत आज 1538.85 रुपये झाली आहे. याचा अर्थ जर तुम्ही 2003 मध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.12 कोटी रुपये झाले असते. असे नाही की हा स्टॉक फक्त दीर्घ काळातच वाढला आहे, उलट शेअरमध्ये ही वाढ अल्पावधीतच पाहायला मिळाली होती. 27 मार्च 2022 रोजी पॉलीप्लेक्स कॉर्प कंपनीचे शेअर 301.60 रुपयेवर ट्रेड करत होते. म्हणजेच यावेळी गुंतवणूकदारांचे पैसे 414 टक्के वाढले होते. मात्र मागील काही दिवसांपासून शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.

11 एप्रिल 2022 रोजी या कंपनीचे शेअर 2870 रुपयेवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2,870 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1,462 रुपये होती. मागील वर्षी 11 एप्रिल 2022 रोजी या कंपनीचे शेअर 2870 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील काही महिन्यांपासून या स्टॉकमध्ये विक्रीचा दबावा पाहायला मिळत आहे. मागील 8 महिन्यांत शेअरची किंमत 49 टक्क्यांनी कमजोर झाली आहे.

कंपनीची बद्दल थोडक्यात :
कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, ही कंपनी जगातील सातव्या क्रमांकाची पॉलिस्टर उत्पादन करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी मुख्यतः पातळ प्रकारचे पॉलिस्टर बनवण्याचे काम करते. सोबत कंपनी जाड प्रकारचे पॉलिस्टरही तयार करते. कंपनी अनेक प्रकारचे बेस फिल्म याव्यतिरिक्त, मेटालायझर, होलोग्राफी, कोटिंग आणि ट्रान्सफर मेटॅलाइज्ड पेपर सारख्या मूल्यवर्धित फिल्मसाठी लागणारी उत्पादन बनवते. कंपनीचा व्यवसाय जगभरात एकूण 75 देशांतील 2650 हून अधिक ग्राहकांना आपल्या उत्पादनांचा पुरवठा करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Polyplex Corporation Share Price 524051 in focus check details on 16 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x