
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स प्रदाता कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स तेजीत ट्रेड करत आहेत. स्टॉकमध्ये इतक्या वाढीचे कारण म्हणजे कंपनीचे ऑर्डर बुक आणि मजबूत ताळेबंदमुळे शेअर्समध्ये ही वाढ पाहायला मिळत आहे. (Suzlon Energy Share Price)
13 जून रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 15.76 रुपये या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.71 टक्के वाढीसह 15.15 रुपये किमतीवर (NSE Suzlon) ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज फर्मचे मत
भारतीय ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरवर 22 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. सध्याच्या किमतीच्या तुलनेत लक्ष किंमत 49 टक्के अधिक आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या अहवालात तज्ञांनी स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.
सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे. कंपनीचे निव्वळ कर्ज आर्थिक वर्ष 2020 च्या तुलनेत 13000 कोटी रुपयेवरून मार्च 2023 मध्ये 1200 कोटी रुपयेवर आले आहे. याशिवाय अनेक धोरणात्मक कृतीमुळे सुझलॉन एनर्जी कंपनीच्या उद्योगाचे पुनरुज्जीवन झाले आहे.
मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 28.94 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या स्टॉकने लोकांना 108 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षांच्या कालावधीत सुझलॉन एनर्जी स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे 140.86 टक्के वाढवले आहेत.
28 जुलै 2022 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5.43 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. 9 जानेवारी 2008 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 422.26 रुपये या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.
सर्वकालीन उच्चांक किमतीच्या तुलनेत सुझलॉन एनर्जी स्टॉक 97 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. सुझलॉन एनर्जीने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 2,162.76 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. FY17 नंतर सुझलॉन एनर्जी कंपनीचा हा पहिला नफा होता.
मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 912.66 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. दुसरीकडे, FY23 मध्ये कंपनीची निव्वळ विक्री 11 टक्क्यांच्या घसरणीसह 3,538.14 कोटीवर पोहचली होती, जी मागील वर्षी याच तिमाही काळात 3,975.41 कोटी रुपये नोंदवली गेली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.