16 May 2024 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारातून बचत करा! SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' योजना मालामाल करतील, बचत अवघी रु. 500 Post Office Scheme | मोठी कमाई करा! या योजनेत 500 रुपयांची बचत सुरु करा, मिळेल 9,76,370 रुपये परतावा Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय
x

Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तेजीत, शेअर आज अप्पर सर्किट तोडतोय, तेजीचा फायदा घेणार? तपशील वाचा

Brightcom Share Price

Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 30 रुपये अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 31.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Brightcom Group Share Price)

मागील एका महिन्यात 76.78 टक्के परतावा दिला

मागील एका महिन्यात ब्राइटकॉम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 76.78 टक्के परतावा कमावून दिला आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 9.27 रुपये या नीचांक किंमतीवरून 30 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचले आहेत. या काळात शेअरची किंमत 223.63 टक्के वाढली आहे.

5 वर्षात दिला 1,467.84 टक्के परतावा

जून 2023 मध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 20 सेशनपैकी पाच सेशनमध्ये घसरले होते. तर उर्वरित सेशनमध्ये स्टॉक अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांची गुंतवणूक असलेला हा स्टॉक मागील पाच वर्षांत 1,400 टक्के वाढला आहे. शंकर शर्मा यांच्याकडे मार्च 2023 पर्यंत ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे 1.24 टक्के भाग भांडवल होते.

शेअर इंडिया फाईम तज्ज्ञ म्हणाले

शेअर इंडिया फाईम तज्ज्ञ म्हणाले की, ब्राइटकॉम ग्रुप स्टॉक पुढील काळात 40 रुपयेपर्यंत वाढू शकतो. जून महिन्याच्या सुरुवातीला SEBI ने एप्रिल 2020 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत इनसाइडर ट्रेडिंगशी संबंधित नियामक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या प्रवर्तकांवर 40 लाख रुपये दंड आकारला होता. ब्राइटकॉम कंपनीने माहिती दिली की, हा निर्णय आदेश एका वेगळ्या प्रकरणाशी संबंधित आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने या संदर्भात आधीच स्पष्टीकरण दिले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Share Price today on 30 June 2023.

हॅशटॅग्स

Brightcom Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x