16 May 2024 8:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Brightcom Share Price | 31 रुपयाच्या ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तेजी सुरू, गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी ऑर्डर टाकल्या

Brightcom Share price

Brightcom Share Price| ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये अजूनही तेजी सुरू आहे. मागील आठवड्यात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के अप्पर सर्किटसह 28.58 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात ब्राइटकॉम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 63.17 टक्के परतावा कमावून दिला आहे.

या मल्टीबॅगर स्टॉकची नीचांक किंमत पातळी 9.35 रुपये होती. तर आता हा स्टॉक आपल्या वार्षिक उच्चांक किमतीजवळ ट्रेड करत आहे. सोमवार दिनांक 3 जुलै 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 2.24 टक्के वाढीसह 31.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. आपल्या नीचांक किमतीच्या तुलनेत ब्राइटकॉम ग्रुप स्टॉक 223.63 टक्के वाढला आहे.

5 वर्षांत 1,503.02 टक्के परतावा

जून 2023 मध्ये आतापर्यंत 20 ट्रेडिंग सेशनपैकी फक्त पाच सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप स्टॉक लाल निशाणीवर ट्रेड करत होता. उर्वरित सेशनमध्ये हा स्टॉकमध्ये अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी देखील ब्राइटकॉम ग्रुप स्टॉकमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे.

मागील पाच वर्षांत ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1,503.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांनी मार्च 2023 पर्यंत ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे 1.24 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

शेअर इंडिया फर्मच्या तज्ज्ञांच्या मते ब्राइटकॉम ग्रुप स्टॉकमध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते. हा स्टॉक पुढील काळात 40 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असे तज्ञ म्हणाले. सेबीने एक महिन्यांपूर्वी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीला दंड ठोठावला होता. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डने एप्रिल 2020 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत इनसाइडर ट्रेडिंगशी संबंधित नियामक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवत ब्राइटकॉम गुप कंपनीला आणि कंपनीच्या प्रवर्तकांना 40 लाख रुपये दंड आकारला होता.

प्रत्युत्तरात ब्राइटकॉम कंपनीने दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, हा दंड एका वेगळ्या प्रकरणाशी संबंधित आहे. कंपनीने या संदर्भात आधीच स्पष्टीकरण करून माहिती दिली होती. आता मात्र सेबीने ब्राइटकॉम ग्रुप कंपनीला स्कॅनरच्या कक्षेत ठेवले असून सेबी कंपनीच्या आर्थिक कामकाजाचे निरीक्षण करेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Share price today on 03 July 2023.

हॅशटॅग्स

Brightcom Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x