27 July 2024 10:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा HUDCO Share Price | मल्टिबॅगर शेअरसाठी BUY रेटिंग, कंपनीबाबत अपडेट आली, यापूर्वी 400% परतावा दिला
x

Adani Port Share Price | अल्पावधीत पैसे दुप्पट करणारा अदानी पोर्ट्स शेअर पुढे मल्टिबॅगर परतावा देणार? फायद्याची अपडेट

Adani Port Share Price

Adani Port Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच पालोनजी समूहाने ब्राउनफील्ड गोपालपूर पोर्ट अदानी पोर्ट्स अँड एसईझेड लिमिटेड कंपनीला 3,350 कोटी रुपये किमतीवर विकण्याची घोषणा केली आहे. ( अदानी पोर्ट्स कंपनी अंश )

ओडिशा राज्यातील गोपालपूर बंदर 2017 मध्ये एसपी ग्रुपने ताब्यात घेतले होते. सध्या या बंदरावर 20 MTPA माल हाताळले जात आहे. आज बुधवार दिनांक 27 मार्च 2024 रोजी अदानी पोर्ट्स स्टॉक 1.90 टक्के वाढीसह 1,328.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1281.60 रुपये किमतीवर ओपन झाले होते. अल्पावधीत हा स्टॉक 1308 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील सहा महिन्यांत अदानी पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 58 टक्के परतावा कमावून दिला आहे अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1356.55 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 571.55 रुपये होती.

एसपी ग्रुपने आपल्या एका निवेदनात माहिती दिली की, “ग्रीनफिल्ड एलएनजी रीगॅसिफिकेशन टर्मिनल उभारण्यासाठी गोपालपुर बंदराने पेट्रोनेट एलएनजी कंपनीसोबत करार केला होता. गोपालपूर बंदराची विक्री एसपी ग्रुपसाठी मागील काही महिन्यांत करण्यात आलेली दुसरी बंदर निर्गुंतवणूक आहे”. गोपालपूर बंदर आणि धरमतर पोर्टचे एंटरप्राइझ मूल्यावर नियोजित निर्गुंतवणूक करणे हे एसपी गृपची कमी कालावधीत मूल्य निर्माण करण्याची क्षमता प्रतिबिंबित करते. सध्या एसपी गृपवर 20,000 कोटी रुपयेचे कर्ज आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Port Share Price NSE Live 27 March 2024.

हॅशटॅग्स

Adani Port Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x