21 May 2024 3:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

TTML Share Price | टीटीएमएल स्टॉकमध्ये तेजी-मंदीचे चक्र फिरू लागले, स्टॉक खरेदी करावा का? शेअरची कामगिरी पाहून निर्णय घ्या

TTML Share Price

TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 4 जुलै 2023 रोजी सुसुत तेजीत धावत होते. टीटीएमएल कंपनीचे शेअर्स काल 7.37 टक्के वाढीसह 76.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज स्टॉकमध्ये किंचित घसरण पाहायला मिळत आहे.

आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के घसरणीसह 75.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा देणाऱ्या टीटीएमएल स्टॉकची किंमत 149.95 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 49 टक्के कमजोर झाले आहेत. या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 49.80 रुपये होती.

मागील एका महिन्यात टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 16.61 टक्के परतावा कमावून दिला आहे. 11 जानेवारी 2022 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 291.05 रुपये या आपल्या आजीवन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांकापासून 73.77 टक्के कमजोर झाला आहे.

सेबीला दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2023 तिमाहीत टीटीएमएल कंपनीने 280 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्याच वेळी कंपनीला 277 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. एक वर्षभरापूर्वीच्या याच तिमाही कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ तोट्यात किंचित घसरण पहायला मिळाली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात टीटीएमएल कंपनीने 1,106.17 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, आणि त्यावेळी कंपनीला 1144 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

कंपनीचा व्यवसाय :

टीटीएमएल ही कंपनी Tata Teleservices या कंपनीची उपकंपनी म्हणून काम करते. ही कंपनी आपल्या मार्केट सेगमेंटमध्ये लीडर मानली जाते. टीटीएमएल कंपनी आपल्या ग्राहकांना व्हॉईस डेटा सेवा प्रदान करण्याचे काम करते. टीटीएमएल कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक दिग्गज कंपन्यांचे नाव सामील आहे. टीटीएमएल कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षापासून मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. मागील एका वर्षात टीटीएमएल कंपनीच्या शेअरची किंमत 36.52 टक्के कमजोर झाली आहे. या वर्षी YTD आधारे टीटीएमएल स्टॉकमध्ये 18.19 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price today on 05 July 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x