17 May 2024 2:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Bajaj Finance Share Price | बजाज फायनान्स शेअरने एका दिवसात 8 टक्के परतावा दिला, तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा

Bajaj Finance Share Price

Bajaj Finance Share Price | बजाज फायनान्स कंपनीच्या शेअर्सनी नवीन रेकॉर्ड बनवला आहे. बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह 7916.70 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमतीवर ट्रेड करत होते. बजाज फायनान्स कंपनीने बिझनेस अपडेट जाहीर केल्यानंतर शेअर्समधे तुफान खरेदी पाहायला मिळाली होती.

आज मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स 0.64 टक्के घसरणीसह 7,810.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5487.25 रुपये होती.

बजाज फायनान्स कंपनीच्या लोन बूकमध्ये तब्बल 34 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मजबूत कर्ज वाढ आणि नवीन ग्राहक संपादन यामुळे बजाज फायनान्स कंपनीने जून तिमाहीत उत्तम कामगिरी केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत बजाज फायनान्स कंपनीच्या लोन बूकमध्ये 34 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. जून तिमाहीत कंपनीची लोन बूक 9.94 दशलक्षवर पोहोचली आहे, जी मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 7.42 दशलक्षवर होती.

बजाज फायनान्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जून 2023 तिमाहीच्या अखेरीस कंपनीची व्यवस्थापन अंतर्गत मालमत्ता 32 टक्क्यांच्या वाढीसह 2.7 ट्रिलियन रुपयेवर पोहचली आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत बजाज फायनान्स कंपनीने आपल्या व्यवस्थापन अंतर्गत मालमत्तेत आतापर्यंतची सर्वाधिक तिमाही वाढ नोंदवली आहे.

30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत ग्राहक फ्रेंचायझीचा महसूल प्रमाण 72.98 दशलक्ष होते, जी 30 जून 2022 रोजी 60.30 दशलक्षवर पोहोचली होती. बजाज फायनान्स कंपनीने जून 2023 च्या तिमाहीत ग्राहक फ्रँचायझीमध्ये जबरदस्त वाढ केली आहे.

ब्रोकरेज हाऊस CLSA ने बजाज फायनान्स कंपनीचे रेटिंग अपग्रेड केले असून शेअरची लक्ष किंमत 9,000 रुपये जाहीर केली आहे. तज्ञांनी बजाज फायनान्स कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी स्टॉकचे रेटिंग आउटपरफॉर्मवरून अपग्रेड केले आहे.

ब्रोकरेज हाऊसने यापूर्वी शेअर्सची लक्ष किंमत 6,000 रुपये जाहीर केली होती. मंगळवारी बजाज फिनसर्व्ह कंपनीसह बजाज फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्येही बंपर तेजी पाहायला मिळाली होती. बजाज फिनसर्व्ह कंपनीचे शेअर्स देखील मंगळवारी 6 टक्के वाढीसह 1626.50 रुपयेवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bajaj Finance Share Price today on 05 July 2023.

हॅशटॅग्स

#Bajaj Finance Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x