15 December 2024 12:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स शेअर अप्पर सर्किट तोडत आहे, या तुफान तेजीचा फायदा घेणार?

Genus Power Share Price

Genus Power Share Price | जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 2,207.53 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली. (Genus Share Price)

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह 149.6 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीचे शेअर्स 19.98 टक्के वाढीसह 169.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 129.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या शेअरची किंमत 99.00 टक्के वाढली आहे. स्टॉकमध्ये सध्या सुरू असलेल्या खरेदीचे कारण म्हणजे, जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 27.69 लाख स्मार्ट प्रीपेड मीटर, फीडर मीटरचा पुरवठा, इन्स्टॉलेशन, यासाठी अॅडव्हान्स्ड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस प्रोव्हायडरची नियुक्ती करण्यासाठी 2,207.53 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली आहे. असा खुलासा कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये सादर केला आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीच्या ऑर्डर इनफ्लोचे प्रमाण मजबूत आहे. पुढील तिमाहीत देखील कंपनीला उत्तम महसूल परतावा मिळणे अपेक्षित आहे. मागील तीन वर्षात जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 503 टक्के परतावा कमावून दिला आहे.

जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 312.32 टक्के वाढली आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 73.38 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Genus Power Share Price today on 05 July 2023.

हॅशटॅग्स

Genus Power Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x