
Genus Power Share Price| जीनस पॉवर या इलेक्ट्रिक उपकरणांशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत धावत होते. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 168.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील शेअरची किंमत हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे.
आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी जीनस पॉवर कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के वाढीसह 170.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 179.80 रुपये होती. तर शेअरची नीचांक पातळी किंमत 72.50 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4320 कोटी रुपये आहे.
मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये Genus Power Infrastructure Ltd कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 40.96 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 68.26 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील बरा महिन्यात जीनस पॉवर स्टॉकची किंमत 124.31 टक्के वाढली आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100.94 टक्के नफा कमावून दिला आहे.
जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने प्रगत मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सेवा प्रदान करण्यासाठी सिंगापूरच्या GIC ची उपकंपनी जेम व्ह्यू इन्व्हेस्टमेंटसोबत व्यापारी करार केला आहे. या करारात GIC चा वाटा 74 टक्के तर जीनस पॉवर कंपनीचा वाटा 26 टक्के असेल. या दोन्ही भागीदारांनी या करारात 2 अब्ज डॉलर्स भांडवल गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.
जीनस पॉवर कंपनी स्मार्ट मीटर आणि संबंधित सेवांसाठी प्लॅटफॉर्मची विशेष पुरवठादार म्हणून काम करणार आहे. मागील काही महिन्यांपासून जीनस पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे कंपनीबाबत सकारात्मक बातम्या येत आहेत. जीनस पॉवर कंपनीला 27.69 लाख स्मार्ट प्रीपेड मीटरचा पुरवठा करण्याचा आणि इन्स्टॉलेशनसह कमिशनिंग AMI प्रणालीचे डिझाइन आणि प्रगत मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस प्रोव्हायडरच्या नियुक्तीसाठी 2,207.53 कोटी रुपये मूल्याचे LOA प्रदान करण्यात आले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.