
Vasa Denticity Share Price | वासा डेंटिसिटी या कंपनीच्या IPO स्टॉकने अवघ्या एका महिनाभरात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स एक महिनाभरापूर्वी स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते. याकाळात गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढले आहे. (Vasa Share Price)
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी देखील वासा डेंटिसिटी कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे लावले आहे. आशिष कचोलिया यांनी वासा डेंटिसिटी कंपनीचे 4.39 लाख शेअर्स धारण केले आहेत. आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के घसरणीसह 369 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स 128 रुपयेवरून वाढून 386 रुपयेवर पोहोचले आहेत. वासा डेंटिसिटी कंपनीचा आयपीओ स्टॉक 121-128 रुपये प्राइस बँडवर लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO मध्ये स्टॉक 128 रुपये किमतीवर इश्यू करण्यात आले होते. वासा डेंटिसिटी कंपनीचे शेअर्स एनएसई एसएमई इंडेक्सवर 2 जून 2023 रोजी सूचीबद्ध करण्यात आले होते.
या कंपनीचे शेअर्स 65 रुपये प्रीमियम किमतीसह 211 रुपयेवर सूचीबद्ध झाले होते. Vasa Denticity कंपनीचे शेअर्स 5 जुलै 2023 रोजी 386.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 422 रुपये होती.
वासा डेंटिसिटी कंपनीचा IPO स्टॉक 73 पट सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मधील रिटेल कोटा 58.07 पट सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 156.09 पट सबसक्राईब करण्यात आला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 37.26 पट सबस्क्राइब झाला होता. वासा डेंटिसिटी कंपनीच्या IPO पूर्वी प्रवर्तकांनी 95 टक्के भाग भांडवल धारण केले होते. IPO नंतर हे प्रमाण 69.62 टक्के झाले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.