28 April 2024 8:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

India Cements Share Price | या सिमेंट कंपनीचे शेअर्स 40 टक्के स्वस्त होऊ शकतात, स्टॉक स्वस्तात खरेदी करावा? तज्ञ काय म्हणाले?

India Cements Share Price

India Cements Share Price | सिमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘इंडिया सिमेंट्स’ च्या शेअर्समधील विक्रीचा दबाव काही थांबायचे नाव घेत नाही. अवघ्या पाच महिन्यात या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक विक्रमी उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 37 टक्क्यांनी खाली घसरले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते शेअर मध्ये किमान 40 टक्क्यांची घसरण होणे अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे, ज्यामुळे ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने इंडिया सिमेंट कंपनीच्या शेअरवर ‘sell’ रेटिंग कायम ठेवले आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअरसाठी 112 रुपये लक्ष किंमत दिली आहे. मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के वाढीसह 188.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, India Cements Share Price | India Cements Stock Price | BSE 530005 | NSE INDIACEM)

तज्ञ म्हणतात स्टॉक विका, कारण :
इंडिया सिमेंट्स कंपनीचा EBITDA तोटा ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीत 160 टक्क्यांनी घसरून 6.6 कोटी रुपयांवर आला आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने EBITDA नफ्याचा अंदाज लावला होता, मात्र कारण कंपनी वाढता खर्च नियोजन करण्यास अपयशी ठरली आहे. कंपनीचा खर्च वार्षिक आधारावर 24 टक्के प्रति टन वाढला, मात्र वार्षिक आधारावर प्राप्ती 6 टक्क्यांनी वाढली, यामुळे कंपनीचा EBITDA वर्षानुवर्षे 158 टक्क्यांनी घटला आहे.

ब्रोकरेज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, कंपनीचा निव्वळ कर्ज ते EBITDA गुणोत्तर FY24 मध्ये 4 पट पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील उच्च किमतीतील अस्थिरता ही कंपनीसाठी चिंतेची बाब आहे. ब्रोकरेज फर्मने FY23-24 EBITDA अंदाजात घट केली आणि स्टॉकवर सेल रेटिंग देऊन शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने एप्रिल ते डिसेंबर 2022 या सहामाही निकालाच्या आधारे शेअरची लक्ष किंमत 140 रुपयांवरून 112 रुपये कमी केली आहे.

तीन महिन्यांत पैसे दुप्पट झाले :
मागील वर्षी 20 जून 2022 रोजी इंडिया सिमेंट कंपनीचे शेअर 145.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर पुढील तीन महिन्यात शेअरची किंमत जवळपास 105 टक्क्यांनी वाढली आणि 20 सप्टेंबर 2022 रोजी इंडियन सिमेंट कंपनीचे शेअर्स 298.45 रुपयांवर पोहोचले होते. मात्र शेअर मध्ये ही तेजी जास्त काळ टिकू शकली नाही. आणि मागील पाच महिन्यांत शेअरची किंमत 37 टक्क्यांनी घसरून 188 रुपयांवर आली आहे. 2023 या नवीन वर्षात शेअरची किंमत 15 टक्क्यांनी खाली आली असली तरी शेअर आणखी 40 टक्के कमजोर होईल असे तज्ञांना वाटते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | India Cements Share Price 530005 INDIACEM stock market live on 07 February 2023.

हॅशटॅग्स

India Cements Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x