
ideaForge Share Price | आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी या ड्रोन बनवणाऱ्या कंपनीने शेअर बाजारात धमाकेदार लिस्टिंग केली आहे. आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 1305.10 रुपये किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत. आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचे IPO शेअर्स गुंतवणूकदारांना 672 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते.
पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी या IPO मधून प्रति शेअर 633.10 रुपये लिस्टिंग प्रॉफिट कमावला होता. म्हणजेच गुंतवणूकदारांनी स्टॉक लिस्टिंगवर एका दिवसात तब्बल 94.21 टक्के नफा कमावला होता. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स 93.01 टक्के वाढीसह 1,297.00 रुपये किमतीवर लिस्टिंग झाले होते.
आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी या ड्रोन कंपनीचा IPO 106.06 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. ज्या गुंतवणूकदारांनी आयडियाफोर्ज कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना बंपर नफा मिळाला आहे. IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 85.20 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.
गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 80.58 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 125.81 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 96.65 पट सबस्क्राईब झाला होता.
आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचा IPO स्टॉक 638-672 रुपये किंमत बँडवर सूचीबद्ध करण्यात आला होता. तर Ideaforge Technology कंपनीचा IPO 26 जून रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. 30 जून 2023 रोजी या IPO चे सबस्क्रिप्शन बंद झाले होते. कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना स्टॉक 672 रुपये या अप्पर किंमत बँडवर वाटप केले. किरकोळ गुंतवणूकदार किमान 1 आणि कमाल 13 लॉट खरेदी करू शकत होते. एका लॉटमध्ये कंपनीने 22 शेअर्स जारी केलं. आणि कंपनीच्या IPO चा आकार 567 कोटी रुपये होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.