14 May 2024 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Multibagger Stocks | पडत्या बाजारात कोणत्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी? हे मल्टिबॅगर शेअर्स तुम्हाला मजबूत कमाई करून देतील

Multibagger Stocks

Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजार शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होता. सुरुवातीच्या काही तासात बीएसई सेन्सेक्स 134.39 अंकांच्या कमजोरीसह म्हणजेच 0.20 टक्क्यांनी घसरून 65,651.25 पातळीवर पोहचला होता. आणि NSE निफ्टी इंडेक्स 35.55 अंकांच्या कमजोरीसह म्हणजेच 0.18 टक्क्यांनी घसरून 19,461.75 पातळीवर पोहचला होता. मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. शेअर बाजार सध्या आपल्या उच्चांक पातळीवर पोहचला आहे, त्यामुळे काही गुंतवणूकदार प्रॉफिट बुकींग करत आहेत.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायटन कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. यासह रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, एचयूएल आणि लार्सन अँड टुब्रो या स्टॉकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत होती. शेअर बाजाराच्या कमजोरीच्या काळात जर तुम्ही कमाई करु इच्छित असाल तर तुम्ही तीन मल्टीबॅगर स्टॉक्सवर लक्ष ठेवले पाहिजे. त्यात KEC इंटरनॅशनल, ब्लॅकबॉक्स लिमिटेड.

KEC इंटरनॅशनल

केईसी इंटरनॅशनल कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीला विविध व्यवसायांशी संबंधित 1042 कोटी रुपये मूल्याचे ऑर्डर प्राप्त झाले आहेत. या ऑर्डरमध्ये रेल्वे, नागरी, केबल आणि पारेषण आणि वितरण व्यवसाय संबधित ऑर्डर सामील आहेत.

केईसी इंटरनॅशनल कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी केईसी इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 1.24 टक्के घसरणीसह 590.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ब्लॅक-बॉक्स लिमिटेड

ब्लॅक-बॉक्स लिमिटेड ही एक IT सक्षम सेवा प्रदान करणारी कंपनी असून स्टॉक एक्सचेंजच्या स्मॉलकॅप सेगमेंटमध्ये सूचीबद्ध आहे. या कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून अप्पर सर्किट तोडत आहेत. नुकताच या कंपनीचे शेअर्स 178 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. मागील 1 महिन्यात ब्लॅक-बॉक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.50 टक्के घसरणीसह 173.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

डिव्हिडंड देणाऱ्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा मिळू शकतो

डिव्हिडंड देणाऱ्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास ही तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. त्यापैकी एसीसी, अंबुजा सिमेंट, अदानी एंटरप्रायझेस, अशोक लेलँड, अॅक्सिस बँक आणि भारत फोर्ज सारख्या कंपन्यां आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करणार आहेत. या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी एक्स डिव्हिडंडवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks today on 08 July 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x