
Reliance Capital Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. शेअर बाजारातील या चढ-उताराच्या काळात दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत.
मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 11.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 11.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील महिन्यात रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 3.29 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. 8 सप्टेंबर 2022 रोजी रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 18.82 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
29 मार्च 2023 रोजी रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 760 रुपयेवर ट्रेड करत होते. 7 जुलै 2023 रोजी रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या कमिटी ऑफ क्रेडिटर्सची बैठक पार पडली होती. रिलायन्स कॅपिटल कंपनीने सेंबीला कमेटी ऑफ क्रेडिटर्सच्या 48 व्या बैठकी संबंधित माहिती दिली आहे.
रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या कमेटी ऑफ क्रेडिटर्सच्या बैठकीत कंपनीच्या प्रशासकाने कंपनीच्या सध्या स्थितीबद्दल माहिती दिली. आणि यासोबतच कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेची स्थिती पुढे नेण्याच्या पर्यायावरही चर्चा केली आहे. रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या लिलावात हिंदुजा समूहाच्या मालकीच्या इंडसइंड इंटरनॅशनल डॉल्डिंग्स फर्मने सर्वात मोठी बोली लावून कंपनी खरेदी केली.
जून 2023 मध्ये कर्जदात्याच्या समितीने इंडसइंड बँकेने जाहीर केलेली 9,661 कोटी रुपयांची सुधारित बोली मान्य केली. IIHL ने लिलावात सर्वाधिक म्हणजेच 9,661 कोटी रुपये रोख ऑफर जाहीर केली आणि 99 टक्के कर्जदात्यांनी या बाजूने मतदान करून मान्यता दिली. रिलायन्स कॅप कंपनीकडे पडून असलेली 500 कोटी रुपये रक्कम देखील कर्जदात्यांना देण्याचा निर्णय झाला आहे. या लिलावातून एकूण 10.200 कोटी रुपये कर्ज वसुली झाली आहे. तर रिलायन्स कॅप कंपनीवर एक 16,000 कोटी रुपये कर्ज आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.