1 June 2024 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 02 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Senior Citizen Saving Scheme | सरकारी बँकेची ज्येष्ठ नागरिकांसाठी खास FD, मिळेल मजबूत व्याजदर आणि परतावा SJVN Share Price | SJVN स्टॉक ना ओव्हर बॉट, ना ओव्हर सोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 25 शेअर्स खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हिट, संधी सोडू नका RVNL Share Price | PSU स्टॉकने 4 वर्षात 2200% परतावा दिला, आता शेअर Hold करावा की Sell? Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक तुफान तेजीत, अप्पर सर्किट हीट, अजून 28 टक्क्यांची तेजी येणार
x

Exhicon Events Share Price | नुकताच सूचीबद्ध झालेल्या एक्झिकॉन इव्हेंट्स शेअरने 242 टक्के परतावा दिला, आता शेअर खरेदी करावा का?

Exhicon Events Share Price

Exhicon Events Share Price | एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअरने सूचीबद्ध झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 242.26 टक्के वाढवले आहे. एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया कंपनीचा आयपीओ मार्च 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. तर हा स्टॉक 17 एप्रिल 2023 रोजी शेअर्स बाजारात सूचीबद्ध करण्यात आला. (Exhicon Share Price)

एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया कंपनीच्या शेअरची IPO किंमत बँड 64 रुपये होती. 6 जुलै रोजी एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया कंपनीच्या शेअरने 258.80 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के घसरणीसह 230.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर्स किमतीचा इतिहास :

मागील एका महिन्यात एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15.09 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील अडीच महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 235 टक्के वाढली आहे. या काळात शेअरची किंमत 67 रुपयेवरून सध्याच्या किंमतीवर पोहोचली आहे. एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 267.50 कोटी रुपये आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :

एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया ही कंपनी प्रदर्शन, परिषद आणि कार्यक्रम उद्योगांना सेवा प्रदान करण्याचे काम करते. या कंपनीची स्थापना 1997 साली मोहम्मद कैम सय्यद यांनी केली होती. या कंपनीला ट्रेड फेअर आणि इव्हेंट्स डोमेनमध्ये काम करण्याचा दोन दशकांहून अधिकचा व्यावसायिक अनुभव असल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे. ही कंपनी पायाभूत सुविधा, व्यवस्थापन आणि विपणन संबंधित सेवा B2B आणि B2C क्लायंटपर्यंत पोहोचवण्यासाठी मेळावे तसेच कार्यक्रम देखील आयोजित करण्याचे काम करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Exhicon Events Share Price today on 11 July 2023.

हॅशटॅग्स

Exhicon Events Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x