17 May 2024 7:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
x

MLA Viral Video | आता कशाला आलात? संतप्त महिलेने भाजपच्या सहकारी पक्षातील आमदाराच्या कानाखाली लगावली

MLA Viral Video

MLA Viral Video | हरियाणातील कैथल जिल्ह्यात जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) आमदार ईश्वर सिंह यांना एका महिलेने कानाखाली मारली. यावेळी उपस्थित लोकांनी सुद्धा आमदाराला धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उशिराने पूर स्थितिचा आढावा घेण्यासाठी जेजेपी पक्षाचे आमदार ईश्वर सिंह चीका येथे आले होते. त्यावेळी लोकांचा प्रचंड संताप झाला आणि त्यांना धक्काबुक्की करायला सुरुवात झाली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आमदारांना विचारत आहे की, पाच वर्षे दिसत नाहीत, आता तुम्हाला काय मिळाले? हरियाणात जेजेपी भाजपसोबत सत्तेत आहे.

निवडणूक जवळ आल्याने आमदाराची प्रतिक्रिया

जेजेपीआमदाराला थप्पड मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार ईश्वर सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. या महिलेवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करायची नाही, मी त्या महिलेला माफ केलं आहे, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे हरयाणात विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने आमदाराने संयमाने घेतल्याचं म्हटलं जातंय.

हरयाणातील अनेक भागात पूर

मुसळधार पावसामुळे हरयाणात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील चिका परिसरात घग्गर नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने ४० गावांना पुराचा धोका असून अनेक गावे पाण्यात बुडाली आहेत. बुधवारी सायंकाळी पंजाब सीमेवरील भाटिया गावातील घग्गर धरणही तुटल्याने गावे पाण्याखाली गेली. राज्यातील पूरपरिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचनाही दिल्या. यासोबतच त्यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणीही केली.

News Title : MLA Viral Video Haryana Flood viral check details on 13 July 2023.

हॅशटॅग्स

#Haryana Flood Video (1)(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x