Lykis Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लाइकिस लिमिटेड या एफएमसीजी कंपनीचे शेअर्स अपर सर्किटवर ट्रेड करत होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लाइकिस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने शेअरची किंमत अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी लाइकिस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.035 टक्के घसरणीसह 86.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील पाच दिवसापासून तेजीत धावणाऱ्या लाइकिस लिमिटेड कंपनीच्या शेअरची तेजी आज मंदावली आहे. मागील 2 दिवसांपासून या कंपनीचे शेअर विक्रीचा दबावात ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात लाइकिस लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15.64 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 6 महिन्यांत लाइकिस लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 91.53 टक्के नफा कमावून दिला आहे. FMCG व्यवसाय करणाऱ्या लाइकिस लिमिटेड कंपनीने मार्च तिमाही आणि 2022-23 आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत लाइकिस लिमिटेड कंपनीच्या महसुलात 83 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 143 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट 12 कोटी रुपये नोंदवला गेला होता. 22 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 11 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 78 रुपयेवर पोहोचला होता. 12 जुलै 2023 रोजी लाइकिस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 82 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 206.24 टक्के परतावा कमावून दिला आहे.
लाइकिस लिमिटेड ही कंपनी होम केअर सेगमेंट, फूड अँड बेव्हरेज सेगमेंट, हेल्थ अँड वेलबीइंग सेगमेंटसह ब्युटी अँड ग्रूमिंग सेगमेंट संबंधित व्यवसाय करते. लाइकिस लिमिटेड कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये Lykis, Beetex, Rocks, Monitor, Mowgli, Tajgi, Cheers, Alivio यासारखे ब्रँड सामील आहेत. लाइकिस लिमिटेड कंपनीची उत्पादने तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
2014 साली लाइकिस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 86 रुपये किमतीवर पोहचला आहे. 30 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 14 रुपये या नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते. या किमतीवरून स्टॉक 600 टक्के वाढला आहे. 17 जून 2022 रोजी लाइकिस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 24 रुपये किमतीवर पोहचले होते, इथून शेअरची किंमत तब्बल 300 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.