
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL या सरकारी कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील 1 वर्षात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. (Rail Vikas Nigam Share Price)
आता कंपनीने एक नवीन माहिती जाहीर केली आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला 808.48 कोटी रुपये मूल्याचा नवीन काँट्रॅक्ट मिळाला आहे. शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.80 टक्के वाढीसह 119.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
ऑर्डर तपशील :
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला NHAI कडून 808.48 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने ओडिशा राज्यात NH-53 किलोमीटर लांबीचे रस्ते रुंदीकरणाची ऑर्डर मिळवली आहे. रेल विकास निगम लिमिटेड ही रेल विकास आणि बांधकाम क्षेत्रातील सरकारी कंपनी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 25,166.19 कोटी रुपये आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.66 टक्के घसरणीसह 118.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील 5 दिवसात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 4 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. मागील एका वर्षात रेल विकास निगम लिमिटेड.कंपनीच्या शेअर्सने लोकांना 285.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 144.50 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 30.30 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.