
Free Bonus Shares | अनमोल इंडिया कंपनीच्या गुंतवणूकदारांना जबरदस्त लाभ मिळणार आहे. या आठवड्यात अनमोल इंडिया कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस म्हणून ट्रेड करणार आहे. अनमोल इंडिया कंपनीमे नुकताच आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. कंपनी आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत देणार आहे.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनमोल इंडिया कंपनीचे शेअर 0.51 टक्क्यांच्या घसरणीसह 222.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी अनमोल इंडिया कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के घसरणीसह 220.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अनमोल इंडिया बोनस शेअर रेकॉर्ड डेट :
अनमोल इंडिया कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीमध्ये कळवले आहे की, कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना एक शेअरवर बोनस शेअर्स म्हणून 4 शेअर्स मोफत देणार आहे. याचा अर्थ रेकॉर्ड तारखेला ज्या लोकांकडे कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना बोनस शेअर्सचा फायदा मिळणार आहे. अनमोल इंडिया कंपनीने आपल्या बोनस इश्यूसाठी 18 जुलै 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे.
शेअरची कामगिरी :
अनमोल इंडिया कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 40.45 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 55.50 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एक महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 5.69 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 258.75 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 134.40 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.