18 May 2024 6:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

भाजपच्या डबल इंजिन सरकारच्या राज्यात हौदोस, मणिपूरमध्ये आणखी 5 महिलांवर त्याच प्रकारे बलात्कार, 10 आमदारांच्या लेखी पत्राने वातावरण पेटलं

Manipur Violence Maitei and Tribals

Manipur Video Viral | मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ हिंसाचार सुरू आहे. दरम्यान, दोन महिलांचा न्यूड परेडचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यात पुन्हा तणाव वाढला आहे. या घटनेवर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात असून लोक कारवाईची मागणी करत आहेत.

दरम्यान, मणिपूरच्या 10 आमदारांनी अजून एक धक्कादायक खुलासा केला आहे. आणखी 5 महिलांसोबत अशा घटना घडल्याचा दावा या आमदारांनी लेखी निवेदनाद्वारे केला आहे. यातील तीन महिलांवर वेगवेगळ्या वेळी बलात्कार झाल्याचा ही दावा करण्यात आला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात या घटना घडल्या आहेत असं या आमदारांनी म्हटलं आहे.

लेखी निवेदन देणारे आमदार ललियांग मांग खौटे यांनीही अशा घटना घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आणखी एक आमदार लेतपाओ हाओकिप म्हणाले की, अशा अनेक घटना घडल्या आहेत. आमच्याकडे अशा घटनांचे व्हिडिओ सध्या नाहीत. मात्र गेल्या दोन महिन्यांत राज्यात अशा घटना घडल्या आहेत. आम्ही संबंधित पीडितांच्या कुटुंबियांशी बोललो आहोत आणि त्या आधारे लेखी निवेदन जारी केले आहे. मात्र आमदारांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणतीही सविस्तर माहिती देण्यापासून स्वतःला लांब ठेवलं आहे, कारण लोकं त्यांच्यावर देखील राग व्यक्त करत आहेत. पोलिसांकडूनही अशा प्रकरणांना दुजोरा मिळालेला नाही.

आमदारांच्या दाव्यावर कोणत्याही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने कोणतीही प्रतिक्रिया अधिकृत दिलेली नाही. या प्रकरणांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी लेखी मागणी आमदारांनी सरकारकडे केली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यात पुन्हा संतापाची लाट उसळली आहे. न्यूड परेडमधील मुख्य आरोपीच्या घराला शुक्रवारी लोकांनी आग लावली. कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून सरकारने राज्यात इंटरनेटवर बंदी घातली आहे. इतकंच नाही तर केंद्र सरकारने कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचा व्हिडिओ शेअर करण्यावर बंदी घातली आहे.

News Title : Manipur 5 more women women’s raped said 10 local MLA check details on 21 July 2023.

हॅशटॅग्स

#Manipur Violence Maitei and Tribals(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x