
Karur Vysya Bank Share Price | करूर व्यसा बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. मात्र आज स्टॉक किंचित विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये करूर व्यसा बँक स्टॉक 1.30 टक्के वाढीसह 130 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील तज्ञांनी देखील करूर व्यसा बँक स्टॉकबाबत तेजी व्यक्त केली आहे.
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने करूर व्यसा बँक स्टॉकवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी करूर व्यसा बँक स्टॉक 0.58 टक्के घसरणीसह 129.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
करूर व्यसा बँक शेअर टार्गेट प्राईस
ICICI सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, करूर व्यसा बँक स्टॉक पुढील काळात 165 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 5 जुलै 2023 रोजी करूर व्यसा बँकचे शेअर्स 137.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 जुलै 2022 रोजी करूर व्यसा बँकेचे शेअर्स 46.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. करूर व्यसा बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 137.75 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 119.50 रुपये होती.
आर्थिक कामगिरी :
जून 2023 तिमाहीत करूर व्यसा बँकेच्या निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे. जून 2023 मध्ये करूर व्यसा बँकेने 57 टक्के वाढीसह 359 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. करूर व्यसा बँकेने बुडीत कर्जाचे प्रमाण कमी केल्याने उत्पन्न वाढले आहे, आणि परिणामस्वरूप बँकेचा निव्वळ नफा वाढला आहे. तामिळनाडू स्थित करूर व्यसा बँकेने मागील वर्षी याच तिमाहीत 235 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या तिमाहीत करूर व्यसा बँकेने एकूण 2,216 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
मागील आर्थिक वर्षांच्या याच तिमाहीत करूर व्यसा बँकेने 1.673 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. करूर व्यसा बँकेचे व्याज उत्पन्न वाढून 1.883 कोटी रुपये नोंदवले होते. मागील आर्थिक वर्षाच्या जून 2022 तिमाहीत करूर व्यसा बँकेचे व्याज उत्पन्न 1.474 कोटी रुपये नोंदवले गेले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.