21 April 2024 5:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 22 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 22 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gratuity Calculator | पगारदारांनो! जर तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर किती लाख ग्रॅच्युइटी मिळेल? येथे जाणून घ्या Ration Card Rules | तुमचा डीलरही कमी रेशन देतो का? फक्त हे काम करा, 1 दिवसात लाईनवर येईल IRCTC Railway General Ticket | रेल्वे जनरल तिकिटाचे हे खास नियम लक्षात ठेवा, अन्यथा तिकीट असूनही मोठा दंड भरावा लागेल EPF Passbook | पगारदारांनो! तुमची बेसिक सॅलरी 10,000 रुपये, वय 30 वर्षे, निवृत्तीनंतर तुम्हाला किती लाख रुपये मिळतील पहा ATM Cash Withdrawal | एटीएममधून पैसे काढताना 'या' लाईटवर लक्ष ठेवा, अन्यथा खाते रिकामे होईल
x

Hot Stock | अजून काय हवं! 88 टक्के परतावा प्लस मजबूत डिव्हीडंड देतोय हा शेअर, स्टॉक नेम सेव्ह करा

Hot stock

Hot Stock | सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू आहे. मागील काही आठवड्यापासून एकामागे एक आयपीओ बाजारात लाँच होत आहे, तर दुसरीकडे काही कंपन्यानी आपले स्टॉक स्प्लिट आणि लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. मिड कॅप कंपनी Ingersol Rand India Limited नेही आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना प्रति शेअर 30 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने लाभांश वाटप करण्यासाठी जी रेकॉर्ड तारीख जाहीर केली होती, त्यात आता कंपनीने बदल केला आहे. यापूर्वी कंपनीने लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड डेट 23 नोव्हेंबर 2022 असे जाहीर केले होते. आता कंपनीने त्यात बदल करून लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख 8 डिसेंबर 2022 असेल असे जाहीर केले आहे.

Ingersol Rand India Limited कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणुकदारांना लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून 23 नोव्हेंबर 2022 ही तारीख निश्चित केली होती. आता कंपनीने 8 डिसेंबर 2022 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. Ingersol Rand India Limited कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामकला माहिती दिली आहे की, कंपनीने नुकताच पार पडलेल्या बैठकीत विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 30 रुपये लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Ingersol Rand India Limited कंपनीचे शेअर्स 2.90 टक्क्यांच्या वाढीसह 2,335.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढले असते. आणि तुम्हाला 194.41 टक्क्यापर्यंत परतावा मिळाला असता. त्याच वेळी मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 277.32 टक्क्यांची मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एका वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स घेतले होते, त्यांना आता 76.24 टक्के परतावा मिळाला आहे. यंदा जगातील सर्व शेअर बाजारात गोंधळाचे वातावरण आहे, तारीख या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 88.20 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. हा कंपनीत प्रवर्तकांची एकूण गुंतवणूक 75 टक्के आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hot stock of Ingersol Rand India Limited share price return on investment on 20 November 2022.

हॅशटॅग्स

#Hot Stock(315)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x