
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाने त्यांच्या कर्ज श्रेणीमध्ये एक नवीन निश्चित परिपक्वता योजना सुरू केली आहे. या न्यू फंड ऑफर अंतर्गत SBI फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन 10 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली आहे. ही न्यू फंड ऑफर 16 नोव्हेंबर 2022 रोजी बंद केली जाईल. ही जोखीम च्या अनुषंगाने ही एक ओपन एंडेड स्कीम आहे. म्हणजेच यातील पैसे मॅच्युरिटीपूर्वी काढता येणार नाहीत. आणि या म्युचुअल फंड योजनेत जोखीम मध्यम स्वरूपात आहे.
किमान 5,000 रुपये गुंतवणूक :
SBI म्युच्युअल फंडाच्या SBI फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनमध्ये किमान गुंतवणूक मर्यादा 5,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. यानंतर तुम्ही 100 रुपये च्या पटीत गुंतवणूक करू शकता. या योजनेचा परिपक्वता कालावधी 364 दिवस आहे. या म्युचुअल फंड योजनेचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टी-50 निर्देशांक आहे. डेट फिक्स्ड मॅच्युरिटी श्रेणीच्या या न्यू फंड ऑफरमध्ये जोखीमीचे प्रमाण मध्यम आहे. हा क्लोज एंडेड प्रकारचा म्युचुअल फंड असल्याने यावर एंट्री आणि एक्झिट लोड लागू होणार नाहीत.
कोणी गुंतवणूक करावी :
SBI म्युच्युअल फंड तज्ज्ञांच्या मते या योजनेच्या कालावधीत भांडवली वाढीसह उत्पन्न मिळवण्यासाठी हा एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. या योजनेत कर्ज,मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स, आणि सरकारी रोख्यांमध्ये पैसे लावले जातात. या म्युचुअल फंड योजनेचा मुख्य उद्देश योजनेच्या मुदतपूर्तीच्या दिवशी किंवा त्यापूर्वी परिपक्व झालेल्या कर्ज साधनांच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून उत्तम व्याजदरासह गुंतवणूकदारांना नियमित उत्पन्न कमावून देणे हा आहे. ही गुंतवणूक तुम्हाला भांडवली वाढ देखील प्रदान करेल, मात्र जोखीम असल्याने अपेक्षेप्रमाणे परतावा मिळण्याची शाश्वती नाही.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.