2 May 2024 9:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Kalyan Jewellers Share Price | प्रत्यक्ष सोन्यापेक्षा, सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कल्याण ज्वेलर्सचा शेअर पैसा वेगाने वाढवतोय, 1 दिवसात 6% परतावा

Kalyan Jewellers Share Price

Kalyan Jewellers Share Price | कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी 6 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती. आणि शेअर 246.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या तुलनेत S&P BSE सेन्सेक्स 0.05 टक्क्यांच्या घसरणीसह 65,051 अंकावर ट्रेड करत होता. आज मात्र कल्याण ज्वेलर्स इंडिया स्टॉक विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत.

मागील तीन महिन्यांत कल्याण ज्वेलर्सच्या शेअर कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 250.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत कंपनीने मजबूत कमाई आणि निरोगी व्यावसायिक दृष्टिकोनामुळे निव्वळ नफ्यात 134 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीने वर्ष-दर-वर्ष आधारे पहिल्या तिमाहीत 31 टक्के वाढीसह 4,387 कोटी रुपये ऑपरेशनल महसुल नोंदवला आहे.

मागील काही तिमाहीत कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीच्या भारत आणि मध्य पूर्वेतील सर्व बाजारपेठांमध्ये ग्राहक वाढीमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. भारतात आता पुढील काळात सण आणि लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे कंपनीचे व्यवस्थापन मंडळ पुढील काळात नवीन शोरूम लॉन्च करण्याची योजना आखत आहेत.

कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 50 पेक्षा जास्त शोरूम उघडण्याची योजना आखली आहे. कंपनीने आपल्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या वार्षिक अहवालात माहिती दिली आहे की, या आर्थिक वर्षात कंपनीला महसुलात 23-25 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kalyan Jewellers Share Price today on 01 September 2023.

हॅशटॅग्स

#Kalyan Jewellers Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x