21 May 2024 11:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल ICICI Mutual Fund | पगारदारांना मालामाल बनवणारी म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 35 लाख रुपये परतावा Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Gujarat Airport Video | मोदींचा फिल्मी गुजरात मॉडेल? अहमदाबाद एअरपोर्टची नदी झाली, सुटाबुटातील प्रवाशांचे बूट हातात

Gujarat Airport Video

Gujarat Airport Video | गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अहमदाबाद विमानतळावर गुडघाभर पाणी साचल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये मुसळधार पावसामुळे विमानतळ पाण्याखाली गेल्याचे, धावपट्ट्या आणि टर्मिनल भाग पाण्याखाली गेल्याचे दिसून येत आहे. सुटाबुटातील प्रवाशांवर बूट हातात घेण्याची वेळ आली. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मॉडेलची पोलखोल झाली आहे.

विमानतळावर पाणी साचल्याने प्रवाशांना वेळेवर विमानापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत होत्या. अधिकाऱ्यांनी प्रवाशांना त्यांच्या विमान कंपन्यांशी त्यांच्या उड्डाणांबद्दल तपासणी करण्यास सांगितले आहे. विमानतळ प्रशासनाने पाण्याने झाकलेलं विमातळाचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी धडपडत असताना लोकांना विमानतळावर धडपडत चालावं लागतंय.

एका ट्विटर युजरने लिहिले की, “आता अहमदाबाद विमानतळावरून विमाने उडणार नाहीत तर जहाजे धावतील… #HeavyRains अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचले आहे. आणखी एकाने लिहिले की, “अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या पूर आला आहे. अरे, आता @ArvindKejriwal दोषही देता येणार नाही.”

अहमदाबाद विमानतळावर अपील दाखल
अहमदाबाद विमानतळाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुसळधार पाऊस आणि विमानतळाभोवती पाणी साचल्यामुळे आम्ही सर्व प्रवाशांना विनंती करतो की त्यांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी आपापल्या एअरलाइन्सशी संपर्क साधावा. प्रवाशांना विमानतळावर पार्किंग टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या वाढत्या पातळीसह पुरामुळे विमानतळाच्या पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्या आहेत, हजारो प्रवासी अडकून पडले आहेत आणि अनेकांच्या प्रवासाच्या नियोजनावर परिणाम झाला आहे.

News Title : Gujarat Airport Video Trending check details on 23 July 2023.

हॅशटॅग्स

#Gujarat Airport Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x