नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले आहे. शीला दीक्षित यांच्या जाण्याने दिल्लीच्या राजकारणात कॉंगेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण शीला दीक्षित या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि प्रशासन हाताळणाऱ्या हुशार नेत्या होत्या. तसेच त्यांनी कॉंग्रेस पक्षाकडून पंधरा वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही शिला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदी यांनी ‘ही अत्यंत दु:खद बातमी आहे, दिल्लीच्या विकासामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याची शक्ती मिळो ओम शांती! अस ट्वीट केले आहे.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन