15 May 2024 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल? नोट करा NBCC Share Price | मालामाल होण्याची संधी! NBCC शेअरसहित हे 4 शेअर्स 50% पर्यंत परतावा देतील, स्टॉक सेव्ह करा Penny Stocks | एक वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, सेव्ह करा टॉप 10 पेनी स्टॉकची यादी Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी Reliance Power Share Price | 26 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी अल्पावधीत दिला 2168% परतावा Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याच्या दरात मोठी पडझड, भाव खूप खाली आला, तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता त्यात घसरण पाहायला मिळत आहे. याआधी सोन्याचा भाव 58,000 रुपये आणि चांदीचा भाव 68,000 रुपयांवर आला होता. आता आठवड्याच्या पहिल्या व्यवहारदिवसापासून सराफा बाजारात सोन्या-चांदीत घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने-चांदीच्या दरात ही घसरण झाली आहे. याआधी शुक्रवारच्या सत्रात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. (Gold Price Today)

आज एमसीएक्सवर किंमत घसरली

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (एमसीएक्स) आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी तेजी दिसून येत आहे. सोमवारी सोने 111 रुपयांनी घसरून 59198 रुपये आणि चांदी 285 रुपयांनी घसरून 74685 रुपये झाली. याआधी शुक्रवारी एमसीएक्सवर सोने 59309 रुपये आणि चांदी 74970 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

सराफा बाजारातही घसरण

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 59290 रुपयांवर खुला झाला आहे. आदल्या दिवशी तो 59,455 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोने 165 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडले आहे. सध्या सोने उच्चांकापासून 2,295 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने स्वस्त विकले जात आहे. सोन्याने 11 मे 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 61585 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचला होता.

तुमच्या शहरातील आजचे नवे दर :

* औरंगाबाद, २२ कॅरेट सोने : ५५१५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०१६० रुपये
* भिवंडी, २२ कॅरेट सोने : ५५१८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०१९० रुपये
* कोल्हापूर, २२ कॅरेट सोने : ५५१५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०१६० रुपये
* लातूर, २२ कॅरेट सोने : ५५१८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०१९० रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोने : 55150 रुपये, 24 कॅरेट सोने : 60160 रुपये
* नागपूर, २२ कॅरेट सोने : ५५१५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०१६० रुपये
* नाशिक, २२ कॅरेट सोने : ५५१८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०१९० रुपये
* पुणे, २२ कॅरेट सोने : ५५१५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०१६० रुपये
* ठाणे, २२ कॅरेट सोने : ५५१५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६०१६० रुपये

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 24 July 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(214)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x