21 May 2024 2:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

RVNL Share Price | भारत सरकारचा निर्णय RVNL शेअरला कुठे घेऊन जाणार? शेअर्सच्या किंमतीवर नेमका काय परिणाम होणार? डिटेल्स पाहा

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील सुरुवातीच्या काही तासात RVNL स्टॉक 5 टक्के घसरणीसह 125.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Rail Vikas Nigam Share Price)

रेल विकास कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे कारण म्हणजे, भारत सरकारने ऑफर फॉर सेल अंतर्गत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीमधील अतिरीक्त 5.36 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे. या बिक्री केंद्र सरकारच्या तिजोरीत 1,329.90 कोटी रुपये जमा होणार आहे. आज शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी रेल विकास कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.13 टक्के घसरणीसह 122.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सरकारचे स्पष्टीकरण :

केंद्र सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग सचिव तुहिन कांत पांडे यांनी बुधवारी ट्विटरवर माहिती दिली की, केंद्र सरकार RVNL कंपनीचे अतिरीक्त शेअर्स गैर किरकोळ गुंतवणूकदारांना विकणार आहे. किरकोळ गुंतवणुकदार देखील शुक्रवारपासून या विक्रिमधून शेअर खरेदी करू शकतात. भारत सरकारने या ऑफर फॉर सेलमध्ये 5.36 टक्के भाग भांडवल विकण्याचा निर्णय घेतला आहे. जर गुंतवणूकदारांकडून या ऑफर फॉर सेलला जास्त बोली प्राप्त झाली तर सरकार अतिरिक्त 1.96 टक्के शेअर्स विकू शकते.

कंपनीचे स्पष्टीकरण :

रेल विकास कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार प्रस्तावित ऑफर फॉर सेलमध्ये RVNL कंपनीचे 70,890,683 इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकले जाणार आहेत. याचे एकूण भाग भांडवलाशी प्रमाण 3.40 टक्के असेल. यासह कंपनी अतिरिक्त 40,866,394 इक्विटी शेअर्स विकण्याचा पर्याय राहून ठेवणार आहे. जे पेड अप इक्विटी शेअर भांडवलाच्या तुलनेत 1.96 टक्के असेल. या ऑफर फॉर सेल डीलमध्ये एकूण 11.17 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकले जाणार आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ऑफर फॉर सेलमध्ये शेअरची किंमत 119 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. या फ्लोअर प्राईसवर भारत सरकारला 1,329.90 कोटी रुपये मिळणार आहेत. रेल विकास कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये भारत सरकारची किमान भागीदारी ठेवण्यासाठी स्टॉक विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price today on 28 July 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(58)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x