नवी दिल्ली : १६ वी लोकसभा विसर्जित करण्यावर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. तर १७ व्या लोकसभा गठीत करण्याची एनडीए’कडून पूर्ण तयारी सुरु झाली आहे. या दरम्यान एनडीएची आज नवी दिल्ली येथे संध्याकाळी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी नियुक्ती होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री ७:३० वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन नवीन सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत अधिकृत वृत्त अजून प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही.

१६ वी लोकसभा भंग करण्याबरोबर १७ व्या लोकसभेची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेतृत्वात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या त्रिसदस्यीय समितीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीमध्ये नवनिर्वाचित ५४२ खासदारांच्या नावाची यादी राष्ट्रपतींना सोपविण्यात आली. १६व्या लोकसभेचा कार्यकाळ ३ जून पर्यंत संपणार आहे.

नरेंद्र मोदी आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा; उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता